Cannabis is being sold in large quantities in Salcete taluka Dainik Gomantak
गोवा

सासष्टीत गांजाचा विळखा

पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, नागरिकांची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव : गांजाचा विळखा आता सासष्टी तालुक्याचा गळा आवळू लागला असून कडक कारवाई न केल्यास, सासष्टीमध्ये अमली पदार्थांची विक्री हा गंभीर मुद्दा बनण्याची शक्यता असल्याचे दक्षिण गोव्यातील स्थानिकांचे मत आहे. दरम्यान, छापे टाकणे, गुन्हे नोंदवणे आणि नियमित जनजागृती मोहीम राबवणे या रणनीतींवर लक्ष केंद्रित केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

सासष्टीमध्ये 2021 वर्षात अमली पदार्थ (Drugs) आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा अंतर्गत 10 गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर 2020 च्या पहिल्या 10 महिन्यात 17 गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी दावा केला की, प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. पोलिस खात्याने राबवलेल्या जनजागृती मोहीमेमुळे हा फरक पडला असल्याचा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

2021 मध्ये सासष्टीतील 5 पोलिस (police) ठाण्यात दाखल झालेल्या 10 गुन्ह्यांपैकी 4 गुन्ह्यांची नोंद मडगाव पोलिसांत, तीन कोलवा पोलिसांत, दोन फातोर्डा पोलिसांत आणि एक गुन्हा कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात नोंदवले गेले आहेत. 2020 मध्ये पहिल्या दहा महिन्यांत सासष्टी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत 17 गुन्हे दाखल केले, त्यापैकी सात गुन्हे मडगाव (Margao) पोलिसांनी, सहा फातोर्डा (Fatorda) तर प्रत्येकी दोन कोलवा आणि कुंकळ्ळी पोलिसांनी नोंदवले. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT