Candolim goa python burned alive Dainik Gomantak
गोवा

VIDEO: क्रूरतेचा कळस! अजगराला जिवंत जाळले; गोव्यातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल, संतापाचा उद्रेक

Candolim goa python burned alive: कांदोळी (ओर्डा) परिसरात प्राणी क्रूरतेची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, एका व्यक्तीने जिवंत अजगराला जाळून ठार मारल्याचे उघड झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : कांदोळी (ओर्डा) परिसरात प्राणी क्रूरतेची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, एका व्यक्तीने जिवंत अजगराला जाळून ठार मारल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक संस्थेचे क्षेत्र अधिकारी डॅरिल फिंच यांनी यासंदर्भात अधिकृत तक्रार पोलिसांत नोंदवली. तक्रारीनुसार, ३१ मार्च रोजी ओर्डा-कांदोळी येथील मेहबूब नावाच्या व्यक्तीने भारतीय रॉक पायथन (अजगर) जिवंत जाळून ठार मारल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

हा अजगर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित प्रजातींमध्ये मोडतो. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कळंगुट पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित मेहबूबविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेचा पुढील तपास सुरू असून, संबंधितावर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्राणीप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि प्राणी क्रूरतेविरोधात अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरजही यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यात 'यलो अलर्ट'

Rashol MRF Case: 'एमआरएफ'ची मूळ फाईल बीडीओकडे कशी पोहोचली? राशोल कचरा प्रक्रिया शेड प्रकरणात गोवा खंडपीठाचा सवाल

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

SCROLL FOR NEXT