Scrapyard Dainik Gomantak
गोवा

Canacona News: भंगारअड्डे ‌न हटविल्यास पालिकेविरोधात उपोषण; काणकोणच्या नगरसेवकाचा इशारा

Canacona Scrapyards: चार महिने प्रत्येक पालिका बैठकीत आवाज उठवूनही पालिका प्रशासनाकडून कारवाई नाही

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण पालिका क्षेत्रातील भंगार अड्डे ‌न हटविल्यास काणकोण पालिकेचे नगरसेवक धिरज नाईक गावकर मंगळवारी (ता.२३) उपोषण करणार आहेत. यासंबंधी गेले चार महिने प्रत्येक पालिका बैठकीत आवाज उठवूनही पालिका प्रशासन काहीच कारवाई करत नाही. त्यामुळे या सुस्त पालिका प्रशासनाच्या विरोधात येत्या मंगळवारी उपोषण करणार असल्याचे निवेदन नगरसेवक धिरज नाईक गावकर यांनी उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक व पालिका प्रशासनाला दिले आहे.

पालिका क्षेत्रात नऊ अनधिकृत भंगारअड्डे आहेत. ११ मार्चला झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत या अनअधिकृत भंगारअड्ड्यांविरुद्ध कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला होता. मात्र, त्या ठरावाची कारवाई होत नसल्याने उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे नगरसेवक नाईक गावकर यांनी सांगितले.

भंगारअड्ड्यांना नोटिसा

यासंदर्भात पालिका मुख्याधिकाऱ्यांनी अनधिकृत भंगारअड्ड्यांना नोटिसा पाठवून दिल्या असल्याचे सांगितले. बैठकीत नगरसेवकांनी घेतलेल्या ठरावाची कारवाई करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष सारा नाईक देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT