Dhavalim Scrapyard Fire: भंगारअड्ड्याला लागलेल्या आगीमागील कारण शोधण्याची मागणी; कोट्यवधींमध्ये नुकसान

अग्निशमन दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांनी या प्रकरणाची औपचारिक चौकशी करण्यासाठी फोंडा पोलिसांना पत्र लिहिले
RK Scrapyard in Dhavalim Ponda caught major fire
RK Scrapyard in Dhavalim Ponda caught major fire Dainik Gomantak
Published on
Updated on

Dhavalim Scrapyard Fire: गेल्या शुक्रवारी ढवळी येथील एका भंगारवाड्याला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असले तरी आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे भंगारवाड्याचे राखेवर रूपांतर होण्याबरोबरच फोंडा-मडगाव महामार्गाचा काही भाग दोन दिवस बंद करण्यात आला.

RK Scrapyard in Dhavalim Ponda caught major fire
Sanquelim : साखळी रवींद्र भवनात ‘अरंगेत्रम’ उत्साहात

यात गैरप्रकार घडण्याची शक्यता असल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांनी माहिती दिली की अग्निशमन अधिकार्‍यांनी आगीचे कारण शोधण्यासाठी या प्रकरणाची औपचारिक चौकशी करण्यासाठी फोंडा पोलिसांना पत्र लिहिले आहे.

या घटनेत नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज अद्याप आलेला नसल्याची माहितीही मोरजकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, सर्वेक्षक अद्याप घटनास्थळी पोहोचले नाहीत आणि भंगारअड्ड्याच्या आकाराचा विचार करता तोटा कोट्यवधींमध्ये जाण्याची शक्यता आहे.

गेल्या शुक्रवारी दुपारी ही आग लागली होती आणि आग विझवण्यासाठी राज्यभरातील अग्निशमन दल घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. रविवारी सकाळपर्यंत आग विझवण्याचे कार्य सुरूच होते.

त्यामुळे ढवळी येथील फोंडा-मडगाव महामार्ग बंद करण्यात आला होता. दोन दिवस वाहतूक बेतोडा बायपास मार्गाने वळवण्यात आली होती. आग आटोक्यात आल्यानंतरच मार्ग पुन्हा खुला करण्यात आला.

स्थानिकांनी माहिती दिली की, कवळे पंचायत आणि भंगारअड्डा मालक यांच्यात कायदेशीर लढाई वर्षानुवर्षे सुरू होती. याबाबत पुढील सुनावणी 12 मे रोजी होणार होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com