Cancer Screening Mission Goa Canva
गोवा

Goa News: गोव्याने कॅन्सरविरोधात सरसावल्या बाह्या! स्क्रीनिंग अभियानाला गती; 1057 जणांची कर्करोग तपासणी

Cancer Screening Mission: कर्करोगामुळे बळी जाणाऱ्यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या रोगाचे निदान लवकर व्‍हावे यासाठी सरकारने कॅन्सर स्क्रीनिंग अभियान सुरू केले आहे. नुकतेच ते मंडूर, वाळपई, कुडचडे, साखळी आणि काणकोण येथे राबविण्‍यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Cancer Screening Mission Goa

पणजी: कर्करोगामुळे बळी जाणाऱ्यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या रोगाचे निदान लवकर व्‍हावे यासाठी सरकारने कॅन्सर स्क्रीनिंग अभियान सुरू केले आहे. नुकतेच ते मंडूर, वाळपई, कुडचडे, साखळी आणि काणकोण येथे राबविण्‍यात आले. त्‍यास उदंड प्रतिसाद मिळाला. एकूण १०५७ जणांनी तपासणी करून घेतली. त्‍यात २९१ पुरुष आणि ७६६ महिलांचा समावेश होता. दरम्‍यान, सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता कुडतरी येथे अवर लेडी ऑफ कार्मेल हायस्कूलमध्‍ये हे शिबिर होणार आहे.

कॅन्सर स्क्रीनिंग अभियानाचा लाभ घेऊन लवकर निदानास प्राधान्य देण्याचे आणि या मोफत स्क्रीनिंग शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन अभियानाचे प्रमुख डॉ. जगदीश काकोडकर यांनी केले आहे. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास जीव वाचवता येतो, असेही त्‍यांनी सांगितले.

शिबिरात तपासणी करताना दोन रुग्णांमध्ये कर्करोग आढळून आला. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. शिवाय ५५ सौम्य स्तन गाठी आढळल्या. प्रारंभिक अवस्थेतील ग्रीवा कर्करोगाचा एक रुग्ण आढळून आला असून १३ रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत. प्रोस्टेट कर्करोगाचाही एक रुग्ण आढळला आहे. तर, एक ओरल कर्करोगाचा रुग्ण आणि १४ प्रीमॅलिग्नंट प्रकरणे आढळून आली.

कर्करोगाच्या लवकर निदानासाठी कॅन्सर स्क्रीनिंग अभियान हा एक प्रशंसनीय उपक्रम आहे. विविध प्रकारच्या कर्करोगासाठी मोफत तपासण्यांची सुविधा याद्वारे गोमंतकीयांना प्रदान करण्‍यात आली आहे. लवकर निदान होणे हे चांगल्या परिणामांसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्‍यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांच्या आणि आरोग्यसेवा टीमच्या समर्पणाचे मी कौतुक करतो.
विश्‍‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

SCROLL FOR NEXT