Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Foreign Nationals: राज्यात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या दोन विदेशी महिला नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

साखळी: राज्यात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या दोन विदेशी महिला नागरिकांना अटक करण्यात आली आहे. डिचोली पोलिस आणि परकीय नागरिक नोंदणी कार्यालय (Foreigners Regional Registration Office – FRRO) यांच्या संयुक्त कारवाईत साखळी परिसरातून या दोघींना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गोव्यातील पर्यटन आणि परदेशी नागरिकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर अशा कारवायांना महत्त्व प्राप्त झाले असून, पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा या बाबतीत अधिक सतर्क झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com