Goa Governor Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

Cancer: कर्करोगावर मात करता येते; राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांचे वक्तव्य...

कॅन्सर बरा होतो या आजारावर मात करता येते. कर्करोगाच्या आजाराविषयी आपल्या मनात असलेली भीतीला आपण आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास शिकतो असे गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी आज संवाद कार्यक्रमात सांगितले.

दैनिक गोमन्तक

पणजी: कॅन्सर बरा होतो या आजारावर मात करता येते. कर्करोगाच्या आजाराविषयी आपल्या मनात असलेली भीतीला आपण आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास शिकतो असे गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी आज राय पंचायत सभागृहात राशोल, कामुर्ली, कुडतरी आणि राय येथील ग्रामपंचायतींच्या सरपंच, पंच सदस्यांशी संवाद कार्यक्रमात सांगितले.

(Goa Governor Sreedharan Pillai)

गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले राय गावाला भेट देऊन आपल्याला खूप आनंद होत आहे कारण राय आणि केरळमधील त्यांच्या मूळ गावाशी साम्य आहे . हिरवागार निसर्ग आणि शेतीप्रती आपल्या देशाची बांधिलकी दर्शविते. यावेळी आमदार आलेक्स रेजिनाल्डो लॉरेन्स , कामुर्लीचे सरपंच, बॅसिलियो फर्नांडिस, राशोलचे सरपंच जोसेफ वाझ यांचीही भाषणे झाली. डॉमनिक गावकर, मिशेल रेबेलो, एग्सीना डिसोझा, मिहीर वर्धन,अतिरिक्त जिल्हाधिकारी परेश फळदेसाई, उदय प्रभुदेसाई, परितोष फळदेसाई, निमिषा फळदेसाई आदी यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी राशोल सेमिनरी भेट दिली. सेमिनरीचे रेक्टर रेव्ह. फादर अलेक्सो मिनेझिस यांनी त्यांचे स्वागत केले.

रुग्णांना राजभवनाची मदत -

गुरुवारी 11 डायलिसिस आणि 7 कर्करोग रुग्णांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत देण्यात आली. पिल्लई म्हणाले राजभवनचे सुरुवातीचे लक्ष्य 71 डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदत देण्याचे होते परंतु आतापर्यंत 850 हून अधिक रुग्णांना लाभ देण्यात आला आहे.आणि यापुढेही ही मदत सुरूच राहील असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात खळबळ! वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूला होणार अटक, नेमकं प्रकरण काय?

Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर थरार! दाट धुक्यामुळे आठ बस आणि तीन कारची टक्कर; 4 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Winter Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला, पुढील काही दिवस कसं असेल हवामान? वाचा

Anjuna Illegal Hotel: मुख्‍य सचिवांसह 7 प्रतिवादींना नोटिसा, हणजूण येथील बेकायदा हॉटेल प्रकरणी याचिकेची दखल

गोवा आध्‍यात्‍मिक पर्यटनाचे केंद्र व्हावे, क्लब रात्री 12 नंतर बंद करावेत; दुर्घटना कमी होतील- मंत्री विश्‍‍वजीत राणे

SCROLL FOR NEXT