MLA Venzy Viegas Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: डोंगरकापणी करून उभे राहिलेले प्रकल्प रद्द करा; व्हेंझी व्हिएगस

Venzy Viegas: जमिनींचे संरक्षण करण्याची गरज असताना सरकारने दुरुस्त्या आणून रूपांतरण करून लूट चालविली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील पर्यावरण व जमिनींचे संरक्षण करण्याची गरज असताना सरकारने दुरुस्त्या आणून जमिनींचे रूपांतरण करून लूट चालविली आहे. जे केरळमधील वायनाडमध्ये झाले ते गोव्यात होण्यास वेळ लागणार नाही.

ज्या दुरुस्त्या आणल्या त्या जमिनींच्या संरक्षणासाठी नव्हेत. अनेक भागामध्ये डोंगरकापणी करून जे मोठमोठे प्रकल्प उभे राहिले आहेत, ते रद्द करण्याची मागणी बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी आज विधानसभेत वन, नगरपालिका, नगरनियोजन तसेच महिला व बाल विकास खात्याच्या मागण्यांवरील चर्चेवेळी केली.

राज्यातील शेतजमिनी तसेच नैसर्गिक हरित क्षेत्राच्याही कायद्यातील दुरुस्त्यांचा फायदा उठवून बेकायदेशीर त्याचे वसाहतमध्ये रुपांतर झाले आहे. बाणावलीतील सुमारे ८८ हजार चौ. मी. जमिनीचे बेकायदेशीर रूपांतर झाले आहे. त्यामुळे हे दुरुस्ती कायदे गोमंतकीयांसाठी नाहीत, तर गोव्याबाहेरील रिअल इस्टेट बिल्डर्ससाठी आहेत, असे व्हिएगस म्हणाले.

कारापूर - सर्वण येथील अभिनंदन लोढा, सांकवाळ येथील भूतानी, तर रेईश मागूश येथील डीएलएफ प्रकल्प हे डोंगरकापणी करून उभे राहिले आहेत ते रद्द करण्याची मागणी करत आहे. राज्यातील माडापेक्षा मोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. चटईक्षेत्र (एफएआर) वाढवून देऊन राज्यात मोठमोठे इमारत संकुल उभे राहिले आहेत. राज्यातील शेतीजमिनींचे वसाहतीमध्ये रुपांतरण करण्यासाठी काही आमदार व मंत्रीच संबंधित मंत्र्यांकडे अर्ज करतात, असा आरोप आमदार व्हिएगस यांनी केला.

सखल भाग बुजवून बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये

राज्यातील अनेक भागातील सखल भाग बुजवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यावर खात्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे. सखल भाग असलेल्या जागा बुजवून तेथे बांधकामाला परवानगी दिली जाऊ नये. अनेक ठिकाणी असे भाग बुजवल्याने पावसाळ्यात पूरसदृश्‍य स्थिती निर्माण होते. त्यामुळे सरकारने प्रादेशिक आराखडा तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी. ज्या दुरुस्त्या प्रादेशिक आराखड्यातील चुका सुधारण्यासाठी आणण्यात आल्या आहेत, त्या रद्द करा, अशी मागणी आमदार व्हिएगस यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT