Canacona Dainik Gomantak
गोवा

Canacona: विद्यार्थिप्रिय शिक्षिकेची बदली रद्द, मुलांचा हट्ट पूर्ण; पालकांच्‍या आंदोलनाला यश

Goa school Teacher transfer cancellation: झिल्तावाडी-गावडोंगरी सरकारी प्राथमिक शाळेच्‍या शिक्षिका सुकांती वेळीप यांच्या बदलीच्या आदेशाविरोधात गेले पाच दिवस पुकारलेल्‍या आंदोलनाला अखेर यश आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

काणकोण: झिल्तावाडी-गावडोंगरी सरकारी प्राथमिक शाळेच्‍या शिक्षिका सुकांती वेळीप यांच्या बदलीच्या आदेशाविरोधात गेले पाच दिवस पुकारलेल्‍या आंदोलनाला अखेर यश आले. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी आज आदेश काढून शिक्षिकेची बदली मागे घेतली. दरम्‍यान, तालुका शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत पालकांनी बदली रद्द करण्याची मागणी केली होती.

शिक्षण संचालकांनी २८ नोव्हेंबर रोजी वेळीप यांची नुने-सांगे येथे बदली करून तत्काळ नवीन ठिकाणी रूजू होण्याचा आदेश दिला होता. शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर झालेल्या या अचानक बदलीमुळे पालक व मुलांमध्ये नाराजी होती. स्नेहसंमेलन, सहल आणि परीक्षा जवळ असताना एकमेव विद्यार्थिप्रिय शिक्षिकेची बदली का? असा प्रश्‍‍न पालकांनी केला.

दरम्‍यान, या बदलीमागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप जनार्दन भंडारी, प्रशांत नाईक, विपीन प्रभुगावकर, इजिदोर फर्नांडिस आणि नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी केला होता. पटसंख्या घटलेल्या काळात शिक्षिका वेळीप यांनी गावात फिरून विद्यार्थी संख्‍या वाढविली होती. ‘मॅडम नसतील तर आम्ही शाळेत जाणार नाही’ असा हट्ट मुलांनी धरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

SCROLL FOR NEXT