Canacona कर चुकवेगिरी केल्‍यास दुकानांना लागणार टाळे Dainik Gomantak
गोवा

कर चुकवेगिरी केल्‍यास दुकानांना लागणार टाळे

काणकोण पालिकेचा निर्णय : दुकानदारांकडून थकबाकी वसुलीसाठी मोहीम

दैनिक गोमन्तक

काणकोण (Canacona) : पालिकेचा महसुल बुडविणाऱ्या दुकानदारांनी त्वरित कर व थकित भाडे पालिका तिजोरीत भरणा न केल्यास त्या दुकानांना टाळे लावण्याचा निर्णय काल (ता.२०) झालेल्‍या पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. काही पालिका मालकीच्या गाळेधारकांनी गेली अनेक वर्षे पालिकेचे भाडे थकविले आहे. तसेच काही दुकानदारांनी व्यापारी कर भरलेला नाही.

अडीच कोटींचा महसूल थकला

पालिकेने घरपट्टी व अन्य महसुलाची वसुली करण्यासाठी वसुली अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. सुमारे अडीच कोटी रूपयांचा महसूल थकलेला आहे. त्यासाठी या महसुलाची प्राधान्यक्रमाने वसुली करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. पाळोळे येथे एका हॉटेल व्यवस्थापनाने पदपथ बळकावला आहे. वाहने पदपथावरच पार्क केल्याने येथील रहदारीला, पादचाऱ्यांना अडथळा होत आहे. तसेच गटारावर कॉंक्रिटचा स्लॅब घालून गटारे बंद केली आहेत. त्यामुळे या गटारांची स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून शेजारच्या घरात जाते. त्या हॉटेल व्यवस्थापनावर त्वरित कारवाई करण्याची मागणी नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी केली.

नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. उपनगराध्यक्ष अनिता पागी, मुख्याधिकारी उदय प्रभुदेसाई, पालिका अभियंता अजय नाईक गावकर हे उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक हेमंत नाईक गावकर, लक्ष्मण पागी, शुभम कोमरपंत, नार्सिस्को फर्नांडिस, सुप्रिया नाईक गावकर, नीतू देसाई, गंधेश मडगावकर, सारा नाईक देसाई यांनी चर्चेत भाग घेतला.

काय झाला बैठकीत निर्णय

गेली 24 वर्षे घरपट्टीचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे घरपट्टीच्या वाढीव महसुलाला पालिकेला मुकावे लागले, याबद्दलही बैठकीत चर्चा करण्यात आली.

पालिकेत काही कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्याची प्रक्रिया चालू करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली. गेल्या दहा वर्षांत पालिकेने केलेल्या विकासकामांचा तपशील तयार करण्याची मागणी नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी केली.

आतापर्यंत पालिका क्षेत्रातील फक्त तीस टक्के व्यापाऱ्यांनी परवाना काढलेला आहे. अन्य व्यापाऱ्यांनी निर्धारित मुदतीत व्यापारी परवान्याचे शुल्क न भरल्यास कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: त्या 'मॅडम'ना पकडून देण्याचा सर्व जनतेचा निर्धार!

Ranbir Kapoor In IFFI: 'मला आजही त्या गोष्टीची लाज वाटते'; इफ्फीच्या मास्टरक्लामध्ये रणबीर केला मोठा खुलासा

Camurlim Gram Sabha: कामुर्ली ग्रामसभेत राडा! महिला उपसरपंचास तरुणाकडून मारहाण; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Anjuna Gramsabha: हणजूण मारहाण प्रकरण चिघळले; दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल!

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

SCROLL FOR NEXT