गोव्यातील ऊस उत्पादकांची दिवाळी जोरात!

संजीवनीसाठी गोवा सरकारने 2.5 कोटी केले संमत
संजीवनी साखर कारखाना
संजीवनी साखर कारखानाDainik Gomantak

फोंडा: दयानंदनगर - धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याला राज्य सरकारने अनुदान स्वरूपात अडीच कोटी रुपये संमत केले असून त्यातूनच संजीवनी साखर कारखान्याशी संबंधित ऊस उत्पादकांना विशेष अनुदानरूपात उसाची थकीत बिले अदा केली जाणार आहेत. ऊस उत्पादकांना आत्तापर्यंत 80 टक्के रक्कम अदा केली असून 20 टक्के रक्कम शिल्लक आहे.

आता सरकारने अडीच कोटी रुपये निधी संजीवनीसाठी निर्धारित केल्याने ऊस उत्पादकांना थकीत बिले मिळणार असल्याने यंदाची दिवाळी ऊस उत्पादकांसाठी आनंदात जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ऊस उत्पादकांना गेल्या ‘सिझन''चे नेमके किती पैसे दिले आणि किती शिल्लक राहिले याबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी एक खास बैठक ऊस उत्पादकांनी मागितली असून ही बैठक शक्यतो येत्या 25 तारखेला होणार आहे.

संजीवनी साखर कारखाना
गोव्यातील ‘संजीवनी’त होणार इथेनॉलचा प्रयोग

दयानंदनगर - धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याचा गळीत हंगाम गेल्या वर्षी झाला नाही, मात्र राज्यातील ऊस उत्पादकांचा ऊस खानापूर येथील लैला साखर कारखान्याला पाठवण्यात आला. तरीही काही ऊस उत्पादकांचा ऊस शेतीतच पडून राहिला. या उसाची उचल झाली नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे या पडित उसाची रक्कमही शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठीच ही खास आर्थिक तरतूद सरकारने केली असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात ऊस उत्पादन वाढत नसल्याने बाहेरील राज्यातून ऊस आणून तो गळीत हंगामासाठी वापरावा लागत आहे, त्यामुळे सरकारने संजीवनीचा वापर अन्य उत्पादनासाठी करण्याचा निर्णय मागच्या काळात घेऊन त्यासंबंधीचा प्रस्तावही तयार केला आहे. दरम्यान, संजीवनी बंद पडू नये यासाठी आमदार सुदिन ढवळीकर तसेच आमदार प्रसाद गावकर यांनी विधानसभा अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी संजीवनी बंद पडू देणार नसल्याचे आश्‍वासन दिले होते.

संजीवनी साखर कारखाना
गोव्यातील साखरेची ‘संजीवनी’ आता करणार इथेनॉलची निर्मिती

इथेनॉल निर्मितीवर भर!

संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत असतानाच सरकारने आता संजीवनीत ‘इथेनॉल''ची निर्मिती करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. पुणेस्थित एका कंपनीला याबाबतचा अहवाल त्वरित सादर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. संजीवनीचा वापर केवळ ऊस गळीत हंगामापुरता मर्यादित राहत असल्याने संजीवनी सध्या पांढरा हत्ती ठरला असल्याने सरकारने इथेनॉल निर्मितीचा प्रस्ताव पुढे करून त्याच्या कार्यवाहीवर भर दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com