Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Ramesh Tawadkar: काणकोणच्या विकासकामांना 'विक्रमी' चालना; सभापती तवडकर

Canacona: ६४ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी; बेनुर्डे ते काणकोणपर्यंत रस्त्यालाही मंजुरी

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद: काणकोण येथील विक्रमी विकासकामांना नुसती चालना दिली नाही तर ६४ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळवली. काणकोणचा विकास गतीने होत आहे. बेनुर्डे ते काणकोणपर्यंत रस्त्यालाही मंजुरी मिळाली, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

काणकोण भाजप मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त पक्षातर्फे दिलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुक्रवार, ९ रोजी श्रीस्थळ पंचायत सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सभापतींसह, प्रदेश सचिव सर्वानंद भगत, प्रदेश महिला उपाध्यक्ष चंदा देसाई, सरपंच आनंदु देसाई, सेजल‌ गावकर, निशा च्यारी, दक्षिण गोवा उपाध्यक्ष महेश नाईक, महिला सरचिटणीस मनुजा नाईक गावकर, मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, सरचिटणीस दिवाकर पागी, युवा अध्यक्ष रजनीश कोमरपंत आदी उपस्थित होते.

सुरवातीला विशाल देसाई यांनी अधिवेशन उत्कृष्टरीत्या हाताळल्याबद्दल सभापतींचे कौतुक व अभिनंदन स्वागतपर भाषणात करून पर्यावरण पुरस्कार प्राप्त खोतिगाव सरपंच, पंच व अन्य सर्व नागरिकांचे अभिनंदन केले.

आपल्याला तिरंगा तीन दिवस लावण्याचे सौभाग्य मिळत आहे. रॅलीमध्ये फक्त तिरंगा असावा. अन्य ध्वजांचा वापर करू नये. पोस्ट कार्यालयात ध्वज विक्रीस असून स्वाभिमानी नागरिकांनी ते घ्यावेत. ध्वजामुळे एकता, संघटित शक्तीला बळ मिळते. लोकप्रतिनिधींनी आपल्या आसपासच्या नागरिकांना ध्वज लावण्यास प्रेरित‌ करावे, असे सर्वानंद भगत यांनी पुढे सांगितले.

दरम्यान, काणकोणातील स्मारकांची साफसफाई महिला मोर्चा, श्रीस्थळ, नगरपालिका व आगोंद महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी, गावडोंगरी, खोतिगाव, पैंगीण व लोलये महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी व सदस्य करतील. तसेच सदस्यांची बाईक रॅली (हेल्मेटसह) गुरुवार, १५ रोजी, दुपारी ३.३० वा. आयोजित केली आहे.

मुलांच्या हस्तेच ध्वजारोहण करावे

भाजप भवनाच्या शुभारंभी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा येणार आहेत. त्या कार्यक्रमास उपस्थित राहावे. १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस पक्षाने कार्यक्रम दिलेला असून घरातील लहान मुलगा/मुलगी यांच्या हस्तेच ध्वजारोहण करून भावी पिढीच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवावी, असे प्रदेश सचिव सर्वानंद भगत यांनी सांगितले.

मी सभापती असल्यामुळे येथील प्रश्न विधानसभेत मांडता येत नाहीत, अशी बतावणी करत विरोधी पक्षातील काही नेते काणकोणात येऊन दरबार घेत. आगामी दिवसांत पत्रकार परिषद घेऊन विक्रमी संख्येतील कामांसंबंधी सांगणारच आहे. वायनाडच्या गरजवंतांना घरे उपलब्ध करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांशी बोलूनच घेतला आहे. येणाऱ्या दिवसांत केरळ येथे कार्यकर्ते श्रम-धामकरता जाणार आहेत.
रमेश तवडकर, सभापती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ T20: अभिषेक-सॅमसन जोडीचा धमाका! रोहित-राहुलचा मोडला 6 वर्ष जुना रेकॉर्ड; न्यूझीलंडमध्ये रचला नवा कीर्तिमान

Mohan Bhagwat Vijayadashami Speech: मोहन भागवतांचा 'विश्वगुरू भारताचा' मंत्र; विविधतेचा स्वीकार, समतोल विकास आणि संस्कारांवर भर

Kanpur Crime News: कारच्या छतावर बांधून दीड किमी फरफटत नेलं अन् नंतर चिरडलं... जुनी दुश्मनी ठरली जीवघेणी! कानपूरमध्ये तरुणाची निर्घुण हत्या VIDEO

Cricketer Suspension: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी मोठा धक्का! स्टार खेळाडूवर निलंबनाची कारवाई; नेमकी काय चूक केली?

Congress Party: 'राहुल गांधींची सभा पार्किंगच्या जागेत, ही काँग्रेसची नामुष्की’; दिगंबर कामत यांचा टोला

SCROLL FOR NEXT