Canacona Dainik Gomantak
गोवा

Canacona News : कामधेनू गोशाळेत १३४ गुरांचे संगोपन

Canacona News : गोशाळेचा कारभार देणगीदारांनी दिलेल्या दानातून चालवण्यात येतो. चावडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गोशाळेला ५० हजार रुपयांची देणगी मिळाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News :

काणकोण, मणे-खोतीगाव येथील कामधेनू गोरक्षा संस्थेच्या गोशाळेत १३४ भटक्या गुरांचे संगोपन करण्यात येत आहे. ही गोशाळा उभारण्यासाठी येथील एक जमीनदार किरण देसाई कुटुंबीयांनी जमीन दान केली आहे.

या ठिकाणी सध्या दोन गोठे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, गोशाळासाठी निधी उभारण्यासाठी काढलेल्या देणगी कुपन्सचा निकाल १४ मे रोजी होणार असल्याचे गोशाळेचे अध्यक्ष बाबू कोमरपंत यांनी सांगितले.

कोमरपंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी गुरांची देखभाल ध्यान फाउंडेशनतर्फे करण्यात येते. गुरांची देखभाल करण्यासाठी पाच गुराख्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय सेवाही येथे मिळत आहे.

गोशाळेचा कारभार देणगीदारांनी दिलेल्या दानातून चालवण्यात येतो. चावडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गोशाळेला ५० हजार रुपयांची देणगी मिळाली आहे. तसेच करमलघाट येथील श्री शक्ती गणपती देवस्थान व अन्य संस्थाकडून गोशाळेसाठी देणगी मिळाली आहे.

भटक्या गुरांच्या बंदोबस्तासाठी काणकोण पालिका व तालुक्यातील अन्य पंचायतींबरोबर करार करण्यात आला असल्याचे सचिव जितेंद्र आमशेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT