railway station Dainik Gomantak
गोवा

Goa Railway: लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा द्या अन्यथा...

आपल्या मागणीसाठी थेट आंदोलकांनी काणकोण रेल्वे स्थानकावर उपोषणाला सुरवात केली.

दैनिक गोमन्तक

Goa Railway: काणकोण रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा न दिल्यास सरकार व रेल्वे प्रशासनाची झोप उडविण्याचा इशारा आंदोलकांनी काल दिला आहे. काल सकाळी ठरल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक व समविचारी संघटनेच्या सदस्यांनी रेल्वे स्थानकावर धडक देऊन उपोषणाला सुरवात केली. रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

आम्ही सार्वजनिक मालमत्तेची कोणत्याच प्रकारची हानी करणार नाही. कोकण रेल्वेसाठी जमिनी कवडी मोलाने दिल्या. कोकण रेल्वेचे स्वप्न साकार व्हावे यासाठी प्रसंगी पोलिस कोठडी भोगली त्या काणकोणवासीयांना रेल्वे थांबण्यासाठी उपोषण व आंदोलन छेडावे लागते ही लांच्छनास्पद असल्याचे ज्येष्ठ नागरिक शांताजी नाईक गावकर यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक राजेंद्र देसाई यांनी आंदोलन व उपोषण करून रेल्वे प्रशासन व सरकारला काणकोणवासीयांच्या भावना कळत नसल्यास रस्त्यावर उतरण्यास काणकोणवासीय मागेपुढे पाहणार नाहीत, असे सांगितले.

मोपा विमानतळ हा काणकोणसाठी वरदान न ठरता शाप बनला आहे. त्यावर उतारा म्हणून काणकोण रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा देणे उचित व रास्त असल्याचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापक उल्हास भाटीकर यांनी सांगितले.

यावेळी नवोदय विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य रामकृष्ण नायक यांनी काणकोणात केंद्रीय विद्यालय आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटक काणकोणात येत असतात. त्यांच्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांना काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

काणकोणमधील पर्यटन व्यवसायाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी रेल्वे सुविधा महत्त्वाची आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या गाड्यांचा काणकोण स्थानकावरील थांबा बंद करून पर्यटन व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे, असे संदेश तेलेकर यांनी सांगितले. यावेळी जनार्दन भंडारी, धिरज नाईक गावकर, श्यामसुंदर नाईक देसाई, अनिल भगत यांच्यासह सुमारे शंभर नागरिक उपस्थित होते.

काणकोण रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची येथील नागरिकांची प्रलंबित मागणी असून रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्या मागणीकडे आजपर्यंत दुर्लक्ष करत आहेत. त्यासाठी त्यांना जाग आणण्यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहिला नसल्याचे जनार्दन भंडारी यांनी सांगितले.

रेल्वे अधिकाऱ्यांसोबत लवकरच संयुक्त बैठक

ज्येष्ठ नागरिकांनी उपोषणाचा बडगा उचलल्यानंतर काणकोणचे मामलेदार मनोज कोरगावकर यांनी त्याची गंभीर दखल घेऊन काणकोण रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेचे ज्येष्ठ वाहतूक अधिकारी सुनील नारकर यांना पाचारण केले. यावेळी नारकर यांनी काणकोणवासीयांच्या भावना मी जाणत आहे.

वेळोवेळी त्या भावना रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांकडे पोचविल्या आहेत. आजही भविष्यकाळात आंदोलनाचा उद्रेक होऊ नये यासाठी रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांकडे आंदोलकांच्या उपस्थितीत त्यांनी व्यवस्थापकीय संचालकांकडे दूरध्वनीवर संवाद साधला. त्याप्रमाणे येत्या आठवड्यात रेल्वेचे उच्च अधिकारी व ज्येष्ठ नागरिक यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक काणकोण मामलेदार कक्षात घेण्याचे ठरविण्यात आले.

कोकण रेल्वेचे सभापतींनाही नकारात्मक उत्तर!

सभापती रमेश तवडकर यांनी कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना ३० एप्रिल २०२२ ला पत्र पाठवून काणकोण रेल्वे स्थानकावर मत्स्यगंधा, नेत्रावती व गांधीधाम नागरकोयल या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची सूचना केली होती. मात्र, भारतीय रेल्वेने झीरो बेज टाईम टेबलचा अवलंब केला आहे ती प्रणाली कोकण रेल्वेलाही लागू पडते.

त्यासाठी या मार्गावरील काही रेल्वे स्थानकावरील थांबे रद्द करण्यात आले आहेत. त्यात काणकोण रेल्वे स्थानकाचाही समावेश असल्याचे कोकण रेल्वेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सभापतींना पत्र पाठवून कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ सत्रात मान्यवरांची ‘सेफ बॅटिंग’! 'पॉवर प्ले आहे पण..', भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT