Rape case Dainik Gomantak
गोवा

Canacona: पीएसआय असल्याचे सांगून लैंगिक अत्याचार, खंडणीचाही आरोप

कानाकोना पोलिसांनी प्रवीण गोवाकरवर केला गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

काणकोण येथील मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेला धमकावत ब्लॅकमेल केले असून लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार काल दिनांक 19 सप्टेंबर रोजी काणकोण पोलिसात केली आहे.

पीडितेने काणकोण पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार काणकोण येथील प्रवीण गावकर या आरोपीने आपण पीएसआय असल्याचा बनाव केला. पीडितेशी संबंध प्रस्थापित केले व कालांतराने पीडितेला तिच्या संमतीशिवाय एका खोलीत घेऊन जात अश्लील चित्रफित दाखवली व लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे.

पीडितेने म्हटले आहे की, आपल्याला एका खोलीत नेऊन बलात्कार केला व आपले विवस्त्र अवस्थेतील फोटो काढले व त्याचा वापर करत आपल्याला ब्लॅकमेल केले. त्यानंतर ब्लॅकमेल करत अनेक वेळा माझ्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.

आरोपी गावकर याने पीडितेकडून सुमारे 65 हजार रुपये ही उकळले असून धमकी देत ब्लॅकमेल केल्याच्या आरोपा केला आहे. काणकोण पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद करण्याचे काम बराच वेळ सुरु आहे.

आरोपीला अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतले नसले तरी लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत काणकोणचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी सांगितले की, या लैंगिक अत्याचार प्रकरणात महिला पोलिस उपनिरीक्षक रिफा बार्रेटो पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

Goa Politics: "एकटा लढेन, मागे फिरणार नाही",पक्ष तिकीट न मिळाल्यास 'स्वतंत्र' लढणार; डॉ. केतन भाटीकर यांची मोठी घोषणा

Shreyas Iyer: दुखापतीमुळे चिंता वाढली: श्रेयस अय्यरला ICU मध्ये हलवलं; कुटुंबाला सिडनीला नेण्याची तयारी सुरू

Pakistan Afghan Tension: पाकिस्तानात मोठी चकमक! 4 आत्मघाती हल्लेखोरांसह 25 दहशतवादी ठार, पाक-अफगाण सीमेवर पुन्हा तणाव; स्फोटकांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT