Benaulim:बाणावली परिसरात चाकूच्या धाकाने घर फोडले

चोरट्याने वीजबिलचे कारण देत घरात प्रवेश केला अन् घात झाला
Theft
TheftDainik Gomantak
Published on
Updated on

बाणावली येथे आज सकाळच्या सुमारास घर फोडल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्याने वीजबिलचे कारण देत चोरी केली आहे. घरातील लहान मुलाला दार उघड असे सांगितल्यानंतर मुलाने बिल बाहेर ठेवा, वडील आल्यानंतर ते घेतील असे म्हटले. मात्र चोरट्याने अखेर घरात प्रवेश मिळवला अन् घरातील दागिने लांबवले.

(Theft reported at house of Suresh Jamuni bhendi vado benaulim flee away with cash and gold )

Theft
Digambar Kamat : मुख्यमंत्री गोव्यात परतले, दिगंबर मात्र दिल्लीतच का राहिले?

मिळालेल्या माहितीनुसार बाणावली येथे आज सुरेश जामुनी यांच्या घरातील सुमारे तीन लाखाचे दागिने चोरट्याने पळवले आहेत. सकाळी साडे सातच्या सुमारास जामुनी कामावर निघून गेले असता, दहाच्या सुमारास चोरट्याने वीजबिल द्यायचे आहे. असे सांगत दार उघडा असे म्हटले. मात्र दार न उघडल्याने चोरट्याने पाणी मागितले अन् घरात प्रवेश मिळवला.

Theft
Pratika Marathe : भरतनाट्यम क्षेत्रातला उगवता गोमंतकीय तारा

घरात प्रवेश केला अन् घरातील लहान मुलाला पिण्यास थोडे पाणी मागितले. अन् याच वेळी चोरट्याने चाकूचा धाक दाखवत लहान मुलाला शांत बसण्यासाठी धमकावले, अन् घरातील प्रत्येक खोलीत प्रवेश करत कपाटे फोडली. यावेळी चोरट्याने सुमारे तीन लाखाचे दागिने लांबले असून चोरटे पसार झाल्यावर लहान मुलाने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. मात्र यावेळी वेळ निघूण गेली होती. कारण चोरटा पसार झाला होता.

यावेळी नेमक्या किती जणांनी घरात प्रवेश करत चोरी केले ह्याची माहिती मिळाली नसून घाबरल्याने लहान मुलं ही सांगू शकलेले नाही. याबाबत कोलवाळ पोलिसांना माहिती दिली असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु असल्याचे तक्रारदार जामुनी यांनी सांगितले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी आता सतर्क राहणे आवश्यक आहे.

राजधानी पणजीत चोरीचे प्रकार वाढले

राजधानी पणजीतील सांतिनेज परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रात्री तसेच दिवसाढवळ्याही दुकाने, फ्लॅट फोडण्याचे प्रकार घडत असल्‍याने पणजी पोलिसांची झोप उडाली आहे. या चोऱ्यांमुळे पणजीत व परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com