Goa Railway
Goa Railway Dainik gomantak
गोवा

Goa Railway: काणकोणकरांचा इशारा; आता तीव्र आंदोलनाचाच पर्याय

दैनिक गोमन्तक

Goa Railway: लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना काणकोण रेल्वेस्थानकावर थांबा देण्यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंतची मुदत सरकारला देण्यात आली आहे. या मुदतीत ही मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काल झालेल्या बैठकीत देण्यात आला.

या बैठकीला स्वाभिमानी जागृत काणकोणकार, जेष्ठ नागरिक व्हिजन अँड मिशन प्रोग्रेसिव्ह काणकोण, जनसेना वॉरियर्सचे सदस्य व अन्य समविचारी लोक उपस्थित होते.

कोकण रेल्वेचे अधिकारी व आंदोलक यांची संयुक्त बैठक 19 जानेवारीला काणकोणचे मामलेदार मनोज कोरगावकर यांच्या मध्यस्थीने मामलेदार कार्यालयाच्या परिषदगृहात घेण्यात आली होती. मात्र त्या बैठकीत रेल्वे अधिकारी निकम आंदोलकांना ठोस आश्वासन देऊ शकले नव्हते.

त्यामुळे आंदोलकांनी निर्णय घेण्यासाठी 5 फेब्रुवारी ही मुदत दिली होती. तरीसुद्धा आतापर्यंत त्यासंदर्भात काहीच हालचाल होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार व रेल्वे प्रशासनाला पाच दिवसांची मुदत वाढवून देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

10 फेब्रुवारीपर्यत रेल्वे थांबवण्यासाठी निर्णय झाला नसल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय सर्व समविचारी संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतला आहे.

आंदोलनाचे स्‍वरूप असेल भव्‍य

या आंदोलनाचे स्वरूप बहुआयामी आहे. रास्ता रोको, रेल रोको किंवा ‘काणकोण बंद’चा इशारा देण्यात आला आहे. आंदोलन काळात होणाऱ्या परिस्थितीला सरकार व रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, असे जनार्दन भंडारी यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीला राजेंद्र देसाई, शांताजी नाईक गावकर, अनिल भगत, नगरसेवक धीरज नाईक गावकर, संदेश तेलेकर तसेच अन्य ज्‍येष्‍ठ नागरिक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

Goa Election 2024 Live: मुख्यमंत्री सावंत यांचे सपत्नीक मतदान

SCROLL FOR NEXT