Canacona Garbage  Dainik Gomantak
गोवा

Canacona Garbage : काणकोण पालिकेचे दुर्लक्ष ; अखेर नागरिकांनीच हटवला कचरा

Canacona Garbage : दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात; पालिका प्रशासन कचऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शनिवारी स्थानिक नागरीकांनी ही मोहीम राबविली.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona Garbage :

आगोंद, काणकोण पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पापासून जवळच असलेल्या दुमाणे येथील कचरा साफ करून स्थानिकांनी आदर्शवत उदाहरण घालून दिले.

पालिका प्रशासन कचऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शनिवारी स्थानिक नागरीकांनी ही मोहीम राबविली. या कामांत गौरेश कोमरपंत, उदय कोमरपंत, पर्यटक माल्कम, जेनी, मिलाग्रिना, कैनी, मेल्विन, सुप्रिया नाईक, रोहिश कोमरपंत, सतिश कोमरपंत, निशा कोमरपंत, शुभम कोमरपंत, उर्वेश कोमरपंत, शिवा नाईक, कृष्णा नाईक, या नागरिकंचा समावेश‌ होता.

दुमाणे येथील स्थानिक व आगोंद ते काणकोणचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, वाहनचालकांना दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात येथील दुर्गंधीयुक्त व प्रदुषित पाणी विहिरी व आगोंद नदीतून समुद्रात जाते.

काणकोण पालिकेचे या प्रश्नांकडे गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया उदय कोमरपंत यांनी व्यक्त केली.

दुर्गंधीमुळे आगोंद ते काणकोण मार्गावरील प्रवास नकोसा झाला होता. कचरा प्रक्रिया प्रकल्प ५० मीटर आत असला तरी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. याप्रश्नी लोकप्रतिनिधींना आपली जबाबदारी टाळता येणार नाही. केंद्र सरकारचा स्वच्छ पालिका पुरस्कार लाभल्यामुळे नगरपालिका मंडळाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे गौरीश कोमरपंत म्हणाले.

हा कचरा रेस्टॉरंटचा

आगोंद ते काणकोण या मुख्य रस्त्यावर कमी लोकवस्तीच्या ठिकाणी कचऱ्याच्या गोण्या फेकून पळ काढणारे अनेक जण आहेत. समुद्र किनाऱ्यावरील रेस्टॉरंटचा कचराही येथे मोठ्या प्रमाणात फेकला जातो. त्या गोण्या उघडून तपासल्या तर एक तर बील‌ किंवा इतर वस्तू कुणाच्या आहेत हे स्पष्ट होणार असल्याचे सुप्रिया नाईक यांनी सांगितले.

तक्रारीकडे काणाडोळा

कचराप्रश्नी तक्रार केली तरी याबात असंवेदनशील प्रत्त्युत्तरे दिली जातात. काणकोण पालिकेचे कर्मचारी गेटजवळ वाहनातील कचरा दुस-या वाहनात टाकताना सांडलेला कच-याला हात लावत नाही. त्या ठिकाणी अन्य काहीजण कचरा टाकत असतात, अशामुळे कचऱ्याचे ढीग साचतात, उदय कोमरपंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT