Canacona Dainik Gomantak
गोवा

Canacona: शेतात कचरा पेट्या, गटाराची दुर्गंधी; काणकोणात महिला आक्रमक; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

Canacona Waste Problem: पालिका इमारतीसमोरच असलेल्या जुन्या इमारतीचा स्टेबिलिटी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कारण देत पालिका कार्यालय दोन वर्षांसाठी खाजगी इमारतीत हलविण्यात आले.

Sameer Panditrao

काणकोण: काणकोण पालिकेला नुकताच स्वच्छ पालिका पुरस्कार मिळाला; मात्र प्रत्यक्षात पालिकेच्या चावडी वार्डात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून दुर्गंधीयुक्त गटारामुळे परिसरातील नागरिक आणि विक्रेत्यांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांनी आवाज उठवला असून नगरसेवक धिरज नाईक गावकर यांनी स्वखर्चाने गटार स्वच्छ करून पालिकेला जाग आणली आहे. या प्रकाराबद्दल ग्रामस्थांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवारचा आठवडी बाजार ज्या ठिकाणी भरतो, त्याच ठिकाणी गटार वाहत होते. गटारातून उग्र वास येत होता, त्यात किडे वळवळत होते. नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्यानंतर नगरसेवक नाईक गावकर यांनी जेसीबी लावून संपूर्ण गटार साफ केले. तब्बल दहा पिशव्यांइतका प्लास्टिक कचरा गटारातून काढण्यात आला.

या बाजाराच्या अगदी जवळच दहा वर्षांपूर्वी सुमारे सात कोटी रुपये खर्चून भाजी मार्केटची सुसज्ज इमारत उभारण्यात आली. तळमजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी सोपोर आणि वरच्या मजल्यावर व्यापारी आस्थापनांसाठी जागा उपलब्ध असूनही ही इमारत आजही विना वापर पडून आहे. या गाळ्यांना भाडेपट्टीवर दिल्यास पालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होऊ शकला असता, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पालिका इमारतीसमोरच असलेल्या जुन्या इमारतीचा स्टेबिलिटी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कारण देत पालिका कार्यालय दोन वर्षांसाठी खाजगी इमारतीत हलविण्यात आले. या स्थलांतरासाठी पालिकेने दरमहा तब्बल पन्नास हजार रुपये भाडे दिले. या इमारतीच्या तळमजल्यावर २० हून अधिक दुकाने असूनही ती रिकामी करण्याचा आदेश पालिकेने दिला नाही. पालिका आपल्या कार्यालयाचे स्थलांतर मात्र तातडीने करते, मात्र दुकानदारांविरुद्ध मात्र कारवाई टाळते, अशी टीका माजी मुख्याध्यापक शांताजी नाईक गावकर यांनी केली.

महिला आक्रमक

गटाराच्या दुर्गंधीमुळे महिलांनी पालिकेविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून तातडीने स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक महिलांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: चेन्नईयीनचा विजय एफसी गोव्याने हिरावला; फातोर्ड्यात सामना 1-1 गोलबरोबरीत

Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

Wisdom of the Fourth Tree: तीन झाडांचा अहंकार मोडला, चौथं झाड मात्र आनंदात जगलं; आयुष्याचा मोठा धडा शिकवणारी गोष्ट!

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा भीषण पुराचा तडाखा! बूढी गंडकी नदीने घरे, पूल आणि बेस कॅम्प वाहून नेले, थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT