Canacona: पर्यटन व्यवसायातील कामगारांचे हित जपणार, काणकोणात मंत्री तवडकरांची ग्वाही

Canacona tourism workers meeting: पर्यटन व्यवसायातील कामगारांचे हित जपले जाईल, अशी ग्वाही तवडकर यांनी यावेळी दिली.
Canacona
CanaconaDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: काणकोण तालुक्यातील पर्यटक कुटिरांचे मालक आणि कंत्राटदार यांना सतावणाऱ्या समस्या तसेच कामगारांच्या वेतनासंबंधी कला व संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी बैठक घेतली. पर्यटन व्यवसायातील कामगारांचे हित जपले जाईल, अशी ग्वाही तवडकर यांनी यावेळी दिली.

हंगामी कामगारांच्या वेतनामध्ये सतत वाढ होत असून ती अनिश्चित असल्याने पर्यटक कुटिरमालकांना तसेच कंत्राटदारांना आर्थिक फटका बसतो. यासंबंधीच्या अनेक तक्रारी मंत्री डॉ. रमेश तवडकर यांच्याकडे संबंधितांनी केल्या होत्या.

Canacona
Goa Weather Update: राज्यात मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

त्याला अनुसरून मंत्री तवडकर यांनी काणकोणमधील पर्यटक कुटिरमालक आणि कंत्राटदार यांची खास बैठक घेऊन या प्रश्नावर सखोल चर्चा केली. या बैठकीत हंगामी कामगारांना योग्य वेतन देण्याबरोबरच त्यामध्ये समानता आणण्याचा मुद्दा चर्चेत आला.

Canacona
Goa Government Scheme: 'स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार' योजने अंतर्गत तपासणी करून घ्‍या, CM सावंतांचे महिलांना आवाहन

यामुळे कुटिरमालक आणि कंत्राटदारांच्या व्यवसायामध्ये शाश्वत वृद्धी होणार आहे. त्याचप्रमाणे कामगारांचे हित जपले जाणार असल्याचे मंत्री तवडकर यांनी सांगितले. तवडकर यांनी संबंधितांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच दुसरी बैठक घेणार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com