Shigmo Festival Goa Dainik Gomantak
गोवा

Shigmo Festival Goa: काणकोणात पारंपरिक शिमगोत्सवास दिमाखात प्रारंभ, लोलयेतील सहा मेळांकडून जल्लोष; माजाळी येथील कलाकारांवर मेळांची भिस्त

Canacona Shigmotsav 2026 start: काणकोणातील पारंपरिक शिमगोत्सवाला बुधवारी नमनाने विधीवत प्रारंभ झाला असून होळी पौर्णिमेला मांड मोडून उत्सवाची सांगता होणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

काणकोण: काणकोणातील पारंपरिक शिमगोत्सवाला बुधवारी नमनाने विधीवत प्रारंभ झाला असून होळी पौर्णिमेला मांड मोडून उत्सवाची सांगता होणार आहे.

घुमट, शेमेळ, झांज यांसह सनई-सुर्त यांच्या सुरावटींनी शिमग्याची रंगत वाढते. मात्र, स्थानिक वादक दुर्मिळ झाल्याने शिमगा मेळांना माजाळी (कारवार) येथील कलाकारांवर अवलंबून राहावे लागत आहे.

२५ वर्षांपूर्वी ही साथ स्थानिकांकडून मिळत होती; पण परंपरा पुढे न गेल्याने आज बाहेरील कलाकारांना दशमी ते होळीपर्यंत साथ द्यावी लागते. सहा दिवसांसाठी त्यांना मानधनही दिले जाते. मेळ अंगणात आल्यानंतर तालगडी व आरतीवेळी सनई-सुर्त महत्त्वाची ठरते.

लोलये गावात हिरामेळ, जल्मीमेळ, तानशीकार, शेळकार, कोळकणकार व कारयकार असे सहा मेळ कार्यरत आहेत. हिरामेळ हा देवाचा मेळ मानला जातो; तो बाहेर पडल्यानंतरच अन्य मेळांचा गावात संचार सुरू होतो.

दशमीला ग्रामदैवत श्री केशव देवालयात सर्व मेळ एकत्र येऊन डोंगरवाटेने बोरूस-इडदरकडे प्रस्थान करतात. पोळे ते बोरूस-इडदर परिसरातील विविध वाड्यांवर फेरफटका मारून होळी दहनाने उत्सवाची सांगता होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT