CM Pramod Sawant X
गोवा

CM Pramod Sawant: काणकोणात लवकरच डेअरी फार्म! लोकोत्सव-2024 मध्ये मुख्यमंंत्र्यांची घोषणा

Canacona Lokotsava 2024: काणकोण येथे आयोजित ‘लोकोत्सव-२०२४’च्या उद्‌घाटन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. सावंत यांनी या कार्यक्रमात सरकारतर्फे राबविण्यात येणार विविध योजनांवर प्रकाशझोत टाकला.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona Lokotsava 2024 Opening CM Pramod Sawant Speech

पणजी: काणकोण येथे डेअरी फार्म उभारण्याचे सभापती रमेश तवडकर यांचे स्वप्न असून आम्ही केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठविला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. काणकोणवासीयांचे सहकार्य लाभले आणि जागा उपलब्ध झाली तर मच्छीमार प्रकल्पांतर्गत ३०० मच्छीमारांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल तसेच त्यांना पारंपरिक आणि अत्याधुनिक मासेमारीबाबतही मार्गदर्शन मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले.

काणकोण येथे आयोजित ‘लोकोत्सव-२०२४’च्या उद्‌घाटन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. सावंत यांनी या कार्यक्रमात सरकारतर्फे राबविण्यात येणार विविध योजनांवर प्रकाशझोत टाकला. सरकारतर्फे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करण्यात येतील. युवकांनी केवळ सरकारी नोकऱ्यांच्या पाठीमागे न धावता नव्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी युवकांसाठी ‘मेरा भारत महान’ हे खास पोर्टल सुरू केले आहे. गोव्यातील युवकांनी या पोर्टलवर नावनोंदणी करावी आणि त्याचा लाभ घ्यावा. आयटीआय आणि इतर काैशल्य पदवीप्राप्त युवकांनी रोजगार मोहिमेस हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

‘समृद्ध काणकोण’चे कौतुक

‘डेअरी फार्मिंग’ या प्रकल्पासाठी सभापती तवडकर आग्रही आहेत. हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल. तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी ते सतत प्रयत्नरत आहे. त्यांच्या ‘समृद्ध काणकोण’ या स्तुत्य कार्यक्रमाचे मी खास काैतुक करतो. प्रत्येक तालुक्यात असा आदर्श प्रकल्प राबवायला हवा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ये अज्ञानी', गोव्याला 'कायदाहीन' म्हणणाऱ्या केजरीवालांना भाजपने दिला दम; Post Viral

Goa Liquor Seized: 2 महिने गायब ट्रक सापडला कुंकळ्ळीत, तपासणीत मिळाली लाखोंची दारू; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

ED Raid: दुबईत हवालामार्गे गुंतवणूक! संशयावरून ‘ईडी’ची गोवा, दिल्लीत छापेमारी; अनेकजण ताब्यात

Goa Live News: डिचोलीच्या बगलमार्गावर गुराचा बळी

Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT