Crime Dainik Gomantak
गोवा

Canacona: काणकोणात व्यावसायिकाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, स्थानिकांनी गाडी अडवून केली सुटका; तेलंगणा पोलिसांच्या सहभागाने खळबळ

Jayesh Pagi Kidnapping Attempt: खोला येथील जयेश पागी यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न तेलंगणाच्या कथित पोलिसांकडून करण्यात आला. या प्रकारामुळे काणकोण तालुक्यात एकच खळबळ उडाली.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: खोला येथील जयेश पागी यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न तेलंगणाच्या कथित पोलिसांकडून करण्यात आला. या प्रकारामुळे काणकोण तालुक्यात एकच खळबळ उडाली.

अधिक माहिती अशी, की जयेश पागी यांचा खोला पंचायत क्षेत्रातील किनारी भागात पर्यटन व्यवसाय असून त्यामध्ये तेलंगणा राज्यातील काही व्यावसायिक भागीदार आहेत. त्या भागीदारीत काही कारणामुळे व्यत्यय आल्यामुळे त्यांनी तेलंगणातील आपल्या मित्रांना काणकोणात बोलाविले.

त्यातील काहीजण तेलंगणा राज्याच्या पोलिस खात्यात आहेत. जयेश पागी यांना ते सर्वजण गाडीतून घेऊन जात असताना स्थानिक लोकांनी त्यांना अडवून पागी यांची सुटका केली. त्यानंतर अखिल गोवा क्षत्रिय पागी समाजाचे पदाधिकारी आणि समाजबांधवांनी काणकोण पोलिस स्थानकात येऊन या प्रकरणाची त्वरित चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी दिवाकर पागी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कारवाई करा, अन्यथा मोर्चा

या प्रकरणात कारवाई न केल्यास काणकोण पोलिस स्थानकावर (शनिवारी) शेकडो नागरिकांचा मोर्चा नेणार असल्याचे दिवाकर पागी यांनी यावेळी सांगितले. तेलंगणा राज्यातून आलेल्या गाडीमध्ये एकूण पाचजण होते. त्यामध्ये एक चालक आणि चार पोलिस होते. ते काेणत्या तरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलो आहोत, असे सांगत होते, असे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT