Dengue Cases Dainik Gomantak
गोवा

Dengue Cases : डेंग्यू रोखण्यासाठी आरोग्य खाते सतर्क; पथकाची स्थापना

Dengue Cases : गावडोंगरीत घरोघरी भेट देऊन जागृती करणार

गोमन्तक डिजिटल टीम

Dengue Cases :

पणजी, काणकोण तालुक्यातील गावडोंगरी गावात डेंग्यूच्या वाढत्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य सेवा संचालनालयाने त्यांच्या पथकाची तयारी केली आहे.

गावामध्ये संसर्गजन्य आजारांबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आरोग्य अधिकारी उत्सुक असून गावडोंगरी येथे घरोघरी भेट देताना पंचायत सदस्यांची मदत घेणार

आहेत.

काणकोण तालुक्यातील गावडोंगरी गावात डेंग्यूचे २० हून अधिक संशयित रुग्ण आढळून आल्याने आता डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी स्थानिक समुदायामध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याचे आणि डेंग्यूच्या रुग्णांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्याचे आव्हान आरोग्य विभागाने हाती घेतले आहे.

आरोग्य खात्याच्या राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज युनिट गोवाच्या प्रभारी डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले की, काणकोण तालुक्यातील डेंग्यूच्या रुग्णांची वाढ लक्षात घेऊन काणकोण तालुक्यातील १२ उपआरोग्य केंद्रांना गावडोंगरी उपआरोग्य केंद्रावर लक्ष केंद्रित करून गावातील डेंग्यूच्या स्थितीबाबत विश्लेषण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  शुक्रवारी काणकोणच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील डेंग्यूच्या रुग्णांवर उपाययोजना करण्यासाठी पंचायत सदस्य आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली होती.

गोव्यातील उर्वरित भागांबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, काणकोण तालुक्यातील गावडोंगरी परिसराशिवाय डेंग्यूच्या रुग्णांची वाढ दिसलेला असा कोणताही भाग सध्या नाही.

नागरिकांच्या सहकार्याची गरज

आमचे आरोग्य कर्मचारी स्थानिक पंचायत सदस्यांसोबत असतील, जे घरोघरी भेटी देतील आणि लोकांना डेंग्यू आजाराबाबत जागरूक करतील. काणकोणातील अलीकडची बहुतेक प्रकरणे सुरक्षित पाणी गोळा करण्याच्या पद्धतीचे पालन न केल्यामुळे आहेत.

ताजे पाणी असलेल्या उघड्या डब्यांमध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास झाल्याने रुग्णांच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. डेंग्यूचे रुग्ण कमी करण्यासाठी लोकांच्या सहकार्याची गरज असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकारी डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT