High Court  Dainik Gomantak
गोवा

काणकोण रणजीत सिंह खून प्रकरण! नेपाळच्या आरोपीला जन्मठेप, HC कडून शिक्कामोर्तब

पाळोळे येथील बीच रेस्टॉरंटमध्ये दोघेही एकत्र काम करत होते.

Pramod Yadav

सहकारी कामागाराची हत्या केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या नेपाळच्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावर आता उच्च न्यायालयाने देखील शिक्कमोर्तब केला आहे. निमा कृष्णा तामंग (रा. नेपाळ) असे या आरोपीचे नाव असून, 2019 मध्ये त्याने काणकोण येथे सहकारी रणजीत सिंह खून याचा खून केला होता.

दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने जुलै 2022 मध्ये निमाला जन्मठेपेची शिक्षा आणि 50 हजार रूपयांचा दंड ठोठावला होता. आणि दंड न भरल्यास एक वर्षाचा साधारण कारावास भोगावा लागणार होता. दरम्यान, आता उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षेवर शिक्कामोर्तब केला आहे.

12 फेब्रुवारी 2019 रोजी निमा याने त्याचा सहकारी कामगार रणजीत सिंह (वय 33, रा. पालमपूर, हिमाचलप्रदेश) याचा खून केला होता. निमाने रणजीतच्या डोक्यात लाकडी रिबने हल्ला करत जखमी केले होते. त्यानंतर आरोपी निमा पैसे मोबाईल घेऊन फरार झाला होता.

पाळोळे येथील बीच रेस्टॉरंटमध्ये दोघेही एकत्र काम करत होते. रणजीतचा खून केल्यानंतर तामंगने 12,000 रूपये आणि मोबाईल घेऊन फरार झाला होता. दरम्यान, त्याला अटक केल्यानंतर त्याला काणकोण प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले.

दक्षिण जिल्हा न्यायालयाने त्याच्यावर आरोप निश्चित करून, जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; तरीही केजरीवालांचे ‘एकला चलो’ का?

Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

Bhuipal: रात्री येत होता घरी, जबरदस्ती गाडीत बसवण्याचा केला प्रयत्न; 12 वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा डाव फसला

Water Supply Revenue: पाणी गळती, नादुरुस्त मीटर्स! सरकारला 5 कोटींचा फटका; नासाडी थांबवण्यासाठी एजन्सीची नेमणूक

Aldona: संतापजनक! हळदोण्यात पाळीव कुत्र्याच्या जबड्यावर झाडली गोळी; स्थानिकांची कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT