Canacona Dainik Gomantak
गोवा

Canacona News : राजबाग किनारी भाविकांचा पूर ; मल्लिकार्जुन देवाचे समुद्रस्नान उत्साहात

Canacona News : पारंपरिक विधींसह पालखी मिरवणूक

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News :

काणकोण, भाविकांच्या अलोट गर्दीत श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवाचा आज राजबाग-तारीर येथे समुद्र स्नानाचा पारंपरिक विधी पार पडला.

शिवरात्रीनंतर देवाची पालखी वाजतगाजत वाटेत भाविकांच्या भेटी स्वीकारत राजबाग - तारीर येथे समुद्र स्नानासाठी आणण्यात आली. यावेळी राजबाग- तारीर समुद्र किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित असल्याने किनाऱ्याला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

देवाचे समुद्र स्नान झाल्यानंतर भाविक पवित्र स्नान करतात. यंदा सकाळी पहाटे ५ वाजता श्रींचे चांदीच्या पालखीतून मंदिराकडून समुद्र स्नानासाठी राजबाग तारीर किनाऱ्यावर प्रयाण झाले. पालखीबरोबर ब्राह्मण, वांगडी, वेळीप, महाजन, सेवेकरी, वाजंत्री आणि भक्तजनांचा लवाजमा सोबत होता. मार्गक्रमण करताना वाटेवर सुवासिनींकडून श्रींची ओवाळणी केली. समुद्र किनाऱ्यावर महासमुदायाच्या उपस्थितीत श्रींचा समुद्रस्नान विधी पार पडला.

सर्व धार्मिक विधी व उर्वरित कार्यक्रम झाल्यानंतर श्रींचे पालखीतून आज सकाळी ९.३० वाजता मंदिरात पुनरागमन झाले. त्यानंतर पूजा-अर्चा झाल्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यंदा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी धोंडो दिवस आल्याने रविवारी श्रींच्या समुद्र स्नानाचा विधी आयोजित करण्यात आला, अशी माहिती देवालय समितीचे अध्यक्ष विठोबा देसाई यांनी दिली.

शिमगोत्सवाचे वेध

महाशिवरात्रीनंतर शिमगोत्सवाचे वेध लागत असल्याने पारंपरिक शिमगोत्सवासाठी लागणाऱ्या तोणयो आणि रंगीबेरंगी फुलांनी सजविलेले मुंडासे यावेळी देमानी बाळ्ळी येथील चितारी विक्रीसाठी घेऊन आले होते.

शिवाय देवाला अर्पण करण्यासाठी लागणाऱ्या केळींचा बाजारही किनाऱ्यावर भरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT