Canacona Corporation Meeting Dainik Gomantak
गोवा

Canacona Corporation : अनधिकृत भंगारअड्डे हलवा अन्यथा उपोषणाचा इशारा; यंत्रणेला जाग

Canacona Corporation : तातडीने बैठक : ‘काणकोण’मधील अनधिकृत भंगारअड्ड्यांचा विषय

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण पालिका क्षेत्रातील अनधिकृत भंगारअड्डे हटवावेत, या मागणीसाठी नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी मंगळवारी (ता.२३) उपोषण करण्याचा इशारा देताच सरकारी यंत्रणा जागी झाली. याविषयी आज (ता.२२) काणकोणचे उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर यांनी तातडीने संयुक्त बैठक घेतली.

या बैठकीला मुख्याधिकारी रमेश गावकर, पालिका अभियंता दिलखुश गावकर, पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई व नगरसेवक धीरज नाईक गावकर उपस्थित होते. अनधिकृत भंगारअड्डे एका महिन्यात हटविण्याचे आश्वासन दिल्यानंतर नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी मंगळवारी (ता.२३) नियोजित उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, एका महिन्यात हे भंगारअड्डे न हटविल्यास उपोषण करणार असल्याचे संयुक्त बैठकीनंतर धीरज नाईक गावकर यांनी सांगितले.

दरम्यान, काणकोण पालिका क्षेत्रातील भंगारअड्ड्यांवर गेले चार महिने प्रत्येक पालिका बैठकीत आवाज उठवूनही पालिका प्रशासन काहीच कारवाई करत नाही म्हणून सुस्त पालिका प्रशासनाच्या विरोधात मंगळवारी उपोषण करणार असल्याचे निवेदन नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक व पालिका प्रशासनाला दिले होते.

मुख्याधिकाऱ्यांकडून विनंती

यासंदर्भात पालिका मुख्याधिकाऱ्यांना विचारले असता अनधिकृत भंगारअंड्यांना नोटिसा पाठवून दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मंडळाच्या सदस्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचे नगराध्यक्ष सारा नाईक देसाई यांनी सांगितले.

मात्र, सध्या विधानसभा सुरू असल्याने उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती नव्यानेच मुख्याधिकारीपदाचा ताबा घेतलेले रमेश गावकर यांनी आपल्याला व आपल्या समर्थकांना केल्याचे नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी सांगितले.

कारवाई कधी करणार?

पालिका क्षेत्रात ९ अनधिकृत भंगारअड्डे आहेत. ११ मार्चला झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत या अनधिकृत भंगारअड्ड्यांविरुद्ध कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला होता. मात्र, त्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याने उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता, असे नगरसेवक नाईक गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT