President Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Canacona News : ‘लोकोत्सवा’साठी सभापतींनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Canacona News : त्याकरिता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे. आदर्श युवा संघाचे एक स्वप्न होते ते म्हणजे संघटनेची स्वत:ची एक शाळा असावी ते स्वप्न आज सत्यात उतरले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News : काणकोण येथे ८ ते १० डिसेंबर दरम्यान होऊ घातलेल्या लोकोत्सवानिमित्त मुख्य कार्यकर्त्यांची बैठक आदर्श ग्राम आमोणे येथे शनिवारी घेण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती आणि आदर्श युवा संघाचे अध्यक्ष रमेश तवडकर, तसेच आदर्श युवा संघाचे सचिव अशोक गावकर, श्रीस्थळ पंचायतीच्या सरपंच सेजल गावकर, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, पंच गणेश गावकर, नगरसेवक लक्ष्मण पागी उपस्थित होते.

सभापती तवडकर म्हणाले, की आदर्श युवा संघ ही संघर्षातून निर्माण झालेली संघटना आहे. याची जाणीव सर्वांना असावी, त्याकरिता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे. आदर्श युवा संघाचे एक स्वप्न होते ते म्हणजे संघटनेची स्वत:ची एक शाळा असावी ते स्वप्न आज सत्यात उतरले आहे.

शाळेतील शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळे विद्यालय विविध माध्यमातून यशोशिखरावर पोहचले आहे. तुमच्या विश्वासावरच लोकोत्सव आणि श्रमधाम संकल्पना यशस्वी होत आहे. गोव्यातील नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांचे सत्कार करण्याचे कारण म्हणजे आदरयुक्त सद्भावना निर्माण व्हावी एवढेच.

लोकोत्सव ही सांस्कृतिक आणि सामाजिक विचारसरणीचे प्रदर्शन आहे. अनेक हात नकळतपणे आदर्श ग्रामात वावरत आहेत. कोणतीही गोष्ट सहज साध्य होत नाही, त्यासाठी घामगाळणारा कार्यकर्ता पाहिजे तशी कार्यपद्धती प्रत्येक कार्यकर्त्यातआहे. अशोक गावकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: अभिनयाची जादू आजही कायम! अशोक सराफांनी पुन्हा करुन दाखवला 'प्रोफेसर धोंड'चा सीन; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT