Professor Suchita accident Canacona Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: कर्ती मुलगी गेली; कुटुंब पडले एकाकी, काणकोण येथे कारच्या धडकेत प्राध्यापक सुचिताचा मृत्यू

Professor Suchita accident Canacona: माशे-दापट येथे बुधवारी सकाळी कार व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात प्राध्यापिका सुचिता बांदेकर (२७) यांचा जागीच मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

काणकोण: कारवार-मडगाव महामार्गावर माशे-दापट येथे बुधवारी सकाळी कार व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात प्राध्यापिका सुचिता बांदेकर (२७) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे लोलये परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुचिता या शेळी येथून श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयात दुचाकीने जात असताना समोरून कर्नाटकच्या दिशेने येणाऱ्या केए ३० एम ८१९७ या कारने चुकीच्या बाजूने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्या कारच्या काचावर आपटून पुढे फरफटत गेल्या. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका जबरदस्त होता की कारचे एअरबॅग फुटले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले. काणकोण पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास काणकोण पोलिस करत आहेत.

नाट्य क्षेत्रातही सक्रिय

सुचिता बांदेकर या श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयात कोंकणी विषयाच्या तासिका प्राध्यापिका होत्या. त्या नाट्य क्षेत्रातही सक्रिय होत्या. त्या कुटुंबातील एकमेव कमावत्या होत्या. बारावीत असताना वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आईने मोठ्या कष्टाने त्यांना शिक्षण दिले. घरची जबाबदारी सांभाळत त्या उभ्या राहिल्या होत्या, असे शेळी प्रभागाचे पंच सचिन नाईक आणि दामोदर विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT