Canacona  Dainik Gomantak
गोवा

Canacona News : पहिली निवासी विज्ञान शाखा बलराम शाळेत : सविता तवडकर

Canacona News : : बलराम एज्युकेशन सोसायटीतर्फे आमोणेत सुविधा

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News :

काणकोण, बलराम एज्युकेशन सोसायटीतर्फे यंदा शैक्षणिक वर्षापासून आदर्शग्राम आमोणे येथे निवासी विज्ञान शाखा सुरू करणार असल्याची माहिती बलराम निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या निवासी विज्ञान शाखेत राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावर ६० ते ७० टक्के गुण मिळवून दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. बलराम शिक्षण संस्थेची स्थापना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याच्या हेतूने केली आहे.

सध्या या संस्थेतर्फे एक उच्च माध्यमिक विद्यालय, एक निवासी शाळा, एक डे केअर शाळा तसेच दोन प्राथमिक आणि दोन पूर्वप्राथमिक शाळा चालविण्यात येतात. या सर्व शैक्षणिक शाळांचा स्तर उच्च प्रतिचा आहे. त्यासाठी संस्थेचे कार्यकारी मंडळ सतत प्रयत्नशील आहे. निवासी विज्ञान शाखेचे वर्ग आदर्शग्राम येथे भरविण्यात येतील.

अकरावीत ५० विद्यार्थ्यांना प्रवेश

यंदा अकरावीच्या वर्गात ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. बलराम आश्रम शाळा संकुल सर्व सोयींनीयुक्त आहे. या संकुलात तीन अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा आहेत. या निवासी विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी राज्यातील ग्रामीण भागात जागृती केल्याचे सविता तवडकर यांनी सांगितले.

एस्टेलार संस्थेशी करार

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश तवडकर यांनी ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी आवश्‍यक प्रशिक्षण देण्यासाठी एका नामवंत एस्टेलार संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. आठवड्यातून दोन दिवस विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या बसमधून मडगावात ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती बलराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अंकुश गावकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT