Canacona Bhavan Gomantak Digital Team
गोवा

Canacona News : काणकोण पालिका भवनाचे काम संथ; ठेकेदाराला ‘शो कॉज’

‘जीसुडा’ने कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण : काणकोण पालिका भवनाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण न केल्याबद्दल ‘जीसुडा’ने कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.पालिका भवन प्रकल्पाचे काम पाटो पणजी येथील मेसर्स डी.एस.कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सप्टेंबर २०२१ मध्ये घेतले होते त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये ‘जीसुडा’कडे या कंत्राटदाराने एक करारनामा केला.

त्यानुसार काम निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्यास ‘जीसुडा’ला भरपाई देण्याची तरतूद करारात आहे. त्यानुसार ‘जीसुडा’चे सदस्य सचिव गुरूदास पिळर्णकर यांनी कंत्राटदार कंपनीला नोटिसीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. २८ मार्चला ‘जीसुडा’ने कंत्राटदाराला नोटिस बजावली.

दोन मजली प्रकल्प असून सध्या तळमजल्याचे कामही झालेले नाही. काम निकृष्ट होत असल्याने नगराध्यक्ष रमाकांत गावकर व अन्य नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर काही प्रमाणात बांधकामाने गती घेतली. सध्याची गती बघता भवन प्रकल्प पूर्ततेस दोन वर्षे लागतील,असे दिसत असल्याचे नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT