Canacaona Rain Dainik Gomantak
गोवा

Canacaona Rain : काणकोणात तुफान बरसला; विक्रमी नाेंद

गोमन्तक डिजिटल टीम

Canacaona Rain :

पणजी, राज्यात मॉन्सून दाखल झाल्यापासून मोठ्या प्रमाणात पावसाला सुरवात झाली नव्हती; परंतु मागील दोन दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाला प्रारंभ झाला असून मागील २४ तासांत एकूण ९७ मिमी म्हणजेच ३.८१ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.

काणकोणमध्ये शनिवारी विक्रमी ७.५६ इंच पावसाची नोंद झाली. काणकोणसह सत्तरी, डिचोली, सांगे तालुक्याला पावसाने झोडपले. राज्यात ९ जून रोजी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन गोवा वेधशाळेने केले आहे.

राज्यात ९ जून रोजी रेड अलर्ट असून १० व ११ जून रोजी ऑरेंज तर १२ जून रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १५९.९ मिमी (६.२९ इंच) पावसाची नोंद केली आहे.

‘सचेत’ ॲपचा वापर करा !

गोवा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना जागरूकतेचे आवाहन केले आहे. येत्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पाणी साचलेल्या भागात तसेच पूरसदृश भागात जाऊ नये. अद्ययावत माहितीसाठी सचेत मोबाईल ॲपचा वापर करावा तसेच आपत्कालीन मदतीसाठी ०८३२२४१९५५०, ०८३२२२२५३८३, ०८३२२७९४१०० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच डायल ११२ ची सेवाही उपलब्ध आहे, असे कळविले आहे.

पेडण्यात सर्वांत कमी पाऊस

मागील २४ तासांत सर्वाधिक १९२. २ मिमी म्हणजेच तब्बल ७.५६ इंच पावसाची नोंद काणकोणमध्ये करण्यात आली आहे. साखळी १८४.२ मिमी, केपे १७०.२ मिमी, सांगे १५३.७ मिमी, मडगाव १४३ मिमी, मुरगाव ५८.८ मिमी, फोंडा ५८ मिमी, दाबोळी ५२.१ मिमी, जुने गोवे ४४.३ मिमी, पणजी ३७.९ मिमी, म्हापसा ३१ मिमी, तर पेडणेत २२.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

यादिवशी रहा सतर्क

९ जून - रेड अलर्ट

१० व ११ जून - ऑरेंज अलर्ट

१२ जून - यलो अलर्ट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT