Goa landslide  Dainik Gomantak
गोवा

Goa landslide Hotspot: राज्यात भुस्खलनाच्या घटनांचा अंदाज लावता येणार? धोकादायक ठिकाणांचा नकाशा तयार करणार

संशोधक करताहेत पॅटर्नचा अभ्यास...

Akshay Nirmale

Goa landslide Maping: बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत गोव्यातील पावसाचा बदलता पॅटर्नही समोर आला आहे. गोव्यात कधी पाऊस दीर्घकाळ लांबतो तर कधी अचानकच मुसळधार बरसतो. अशा लहरी पावसामुळे भूस्खलनाचे प्रकार घडतात. तथापि, आगामी काळात भुस्खलनाच्या घटनांचा अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे.

राज्यातील संशोधक याबाबत अभ्यास करत आहेत. तथापि, त्यांना भुस्खलनाच्या डेटाची कमरतता भासत आहे. त्यामुळे भुस्खलनाच्या दृष्टीने असुरक्षित ठिकाणांचा अंदाज लावण्यात अडचण येत आहे.

माहिती आणि आकडेवारीची ही तफावत भरून काढण्यासाठी आणि भूस्खलनाचा अचूक अंदाज वर्तविता यावा यासाठी संशोधकांनी विशिष्ट कालावधीत झालेला पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांची यादी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गोव्यात सन 2021 मध्ये सत्तरीतील साट्रे येथील जंगलात मोठे भुस्खलन झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने गोव्यातील भूस्खलनाचे हॉटस्पॉट्स मॅप करण्यासाठी एक समिती स्थापन केली. समितीने काही असुरक्षित ठिकाणे मार्क केली आहेत.

त्यात सत्तरीमधील साट्रे आणि म्हाऊस, सावर्डेतील काही भाग आणि काणकोणमधील काही भागाचा समावेश आहे.

गोव्याच्या बिट्स पिलानी संस्थेतील प्रा. राजीवकुमार चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, भूस्खलन प्रवण क्षेत्रांचा नकाशा तयार करणाऱ्या राज्य समितीला भुस्खलनाच्या डेटाची कमतरता जाणवली. गोव्यात भूस्खलनाबाबत केवळ चार पेपर प्रकाशित झाले आहेत.

साट्रे येथे मोठ्या भूस्खलनानंतर आम्ही 73 ठिकाणांहून तसेच जिथे भूस्खलन झाले अशा तीन ठिकाणांहून माहिती गोळा केली. आता आम्ही गोव्यासाठी भूस्खलनाची स्वतंत्र यादी तयार करत आहोत.

दरम्यान, साट्रेतील भुस्खलनाचा अहवाल तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या राज्य समितीमध्येही चतुर्वेदी होते.

ते म्हणाले की, गोव्यात हवामान बदलाच्या पॅटर्न बदलल्याने भूस्खलनाच्या घटनांचा अंदाज अधिक अचूकपणे लावणे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. गोव्यात मुसळधार पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढू शकतो. सत्तरीतील भूगर्भीय रचना, चुनखडीच्या रचनांमुळे तिथे भूस्खलनाचा धोका आहे.

चक्रीवादळे मोठ्या प्रमाणात पाऊस आणतात. त्यामुळे भूस्खलन होते. चक्रीवादळ भूस्खलनासाठी ट्रिगर म्हणून काम करतात. जर राज्यात चक्रीवादळांचे प्रमाण वाढले तर भूस्खलनाचा धोकाही वाढेल.

भुस्खलनाचे हॉटस्पॉट ओळखणे, त्यावर राज्यासाठी अलर्ट प्रणाली विकसित करणे, गोव्यासाठी टाइम स्टॅम्प, पावसाच्या डेटासह भूस्खलन यादी तयार करणे गरजेचे आहे. हे उपायच भविष्यात गोव्यात भुस्खलनाच्या घटनांमधून जीवीतहानी वाचविण्यासाठी लाभदायक ठरणार आहेत, असे चतुर्वेदी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT