Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak

Mapusa News: दत्तवाडी म्हापसा येथील सेंट ब्रिटो हायस्कूलची भिंत पुन्हा कोसळली

सुदैवाने कुणीही जखमी नाही; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
Published on

Mapusa Wall collapsed: सततच्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरूवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हापसा येथील दत्तवाडी येथील सेंट ब्रिटो हायस्कूलची संरक्षक भिंत गुरूवारी सायंकाळी कोसळली.

ही भिंत लॅटराइट दगडाने बांधली गेलेली होती. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. गतवर्षी याच भिंतीचा भाग कोसळून एक जण जखमी झाला होता, मात्र जवळपास एक वर्ष झाले तरी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही.

Mapusa News
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये घट; जाणून घ्या आजच्या किंमती

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी लॅटराइट दगडांनी बांधलेल्या कंपाउंड वॉलचा काही भाग कोसळून वीज तार तुटल्याची घटना घडली. पुन्हा भिंत कोसळल्यामुळे येथील रहिवासी आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

वारंवार भिंत कोसळत असल्याने यामागचे मूळ कारण शोधण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिक करत आहेत. गेल्या वर्षीच्या घटनेने भिंतीच्या कमकुवतपणाकडे लक्ष वेधले गेले होते, मात्र त्यावर काहीही उपाययोजना केली गेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com