Campal Panaji LPG gas cylinder theft Dainik Gomantak
गोवा

Cylinder Gas Theft: धोकादायक! उघड्यावर LPG सिलिंडरमधून गॅसचोरी; एजन्सी व्यवस्थापकासह 3 जणांवर गुन्हा दाखल

Panaji LPG Gas Cylinder Theft: गोवा गॅस सर्व्हिसचे व्यवस्थापक फ्रान्सिस मार्टिन आणि एलपीजी सिलिंडर डिलिव्हरी गाडी क्रमांक जीए - ०१- टी - ४२८४ वरील दोन अज्ञात कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एलपीजी गॅसची चोरीविरोधात पणजी पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यात एका स्थानिक गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकाचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी भरलेल्या सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरून गॅस चोरी केल्याचा आणि मानवी जीवन धोक्यात आणल्याचा आरोप तिघांवर लावण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, गोवा गॅस सर्व्हिसचे व्यवस्थापक फ्रान्सिस मार्टिन आणि एलपीजी सिलिंडर डिलिव्हरी गाडी क्रमांक जीए - ०१- टी - ४२८४ वरील दोन अज्ञात कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

ही बेकायदेशीर कृती गुरुवार, १३ रोजी सकाळी अंदाजे ११.३० वा. पणजीतील कांपाल कॉलनीतील ‘मॉम्स किचन’च्या मागे उघडकीस आली. कांपाल-पणजी येथील तक्रारदार कास्तिल्हो नोरोन्हा (४४) यांनी ही कृती पाहिल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनुसार, डिलिव्हरी गाडीतील दोन कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापक फ्रान्सिस मार्टिन यांच्या संगनमताने उघड्यावर एका सिलिंडरमधून दुसऱ्या रिकाम्या सिलिंडरमध्ये एलपीजी गॅसची चोरी केली. याप्रकरणी पणजी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५, ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतचा 'पॉवर शो'! 102 मीटरचा षटकार ठोकत बनला नवा 'सिक्सर किंग', सेहवागचा रेकॉर्ड ब्रेक Watch Video

Goa Vs Rajasthan Tourism: पधारो म्हारो देस! संस्कृती दाखवणारे राजस्थानचे पर्यटन; गोव्याने ही कला शिकण्यासारखी..

Arambol: '..गावकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही'! आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलच्या जमीन रूपांतरणास कडाडून विरोध

Fake Liquor Racket: उसगाव बनावट दारू प्रकरण! दीड कोटींचा मुद्देमाल जप्त; अजून 3 जणांना अटक

अमेरिकेतून 'देसी गर्ल' 7 वर्षानंतर गोव्यात, मालक स्वतः हातात प्लेट घेऊन आला स्वागताला; Video Viral

SCROLL FOR NEXT