Illegal Pubs and Dance Bars in Goa Dainik Gomantak
गोवा

अवैध पब आणि डान्सबारला कळंगुट ग्रामस्थांचा विरोध; कारवाई करण्याची मागणी

Illegal Pubs and Dance Bars in Goa : गोव्यात सुरू असलेल्या अवैध पब आणि डान्सबारवर तातडीने कारवाई करण्याची मागणी कळंगुट ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Illegal Pubs and Dance Bars in Goa : गोवा राज्य हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असण्यामागचे एक कारण म्हणजे इथे असलेले पब्स आणि बार. मात्र या पाश्चात्य गोष्टींमुळे गोव्याच्या संस्कृतीचा नाश होत असल्याचे मत गोव्यातील नागरिकांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे. सध्या याबाबत कळंगुट ग्रामस्थांनी जोर धरला आहे.

गोव्यात सुरू असलेल्या अवैध पब आणि डान्सबारवर तातडीने कारवाई करण्याची मागणी कळंगुट ग्रामस्थांनी केली आहे. (Calangute villagers oppose illegal pubs and dance bars)

प्रसारमाध्यमांशी बोलताना गावकऱ्यांनी सांगितले की, या सगळ्यामुळे स्थानिक महिला किंवा मुलीसाठी घरातून बाहेर पडणे हे अवघड झाले आहे. रात्रीच्या वेळी, कळंगुट रस्ते अनेक विचित्र लोकांनी भरलेले असतात, जे पर्यटकांची लूट करतात. आणि सामान्य नागरीक अशा रस्त्यावरून जाऊ शकत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार कळंगुटमध्ये आणि आजूबाजूला बार आणि रेस्टॉरंटच्या नावाखाली 18-20 पब आणि डान्सबार सुरू आहेत.

कळंगुटमधील बहुतांश व्यवसाय हे बाहेरच्या लोकांकडून चालवले जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून या अवैध धंद्यांना तातडीने आळा घालण्याची मागणी केली आहे.

येत्या 15 दिवसांत ग्रामपंचायतीने अवैध धंदे बंद न केल्यास ग्रामस्थ कायदा हातात घेतील, असा इशाराही उपस्थित अनेक महिलांनी दिला.

8 मे रोजी कळंगुट येथे तीन तरुणांनी आपल्या मुलावर अमानुषपणे हल्ला केल्यानंतर एका महिलेने लावलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना गावकऱ्यांनी सांगितले की, ती महिला लोकांची दिशाभूल करत होती आणि सहानुभूती मिळविण्यासाठी मीडियाचा वापर करत होती.

ही महिला कळंगुट येथील एका नाईट क्लबमध्ये बाऊन्सर म्हणून काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि कांदोळी येथील काही तरुण पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करत असून समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना पळवून लावत असल्याचे त्यांनी सांगितले.

गावकऱ्यांनी पुढे सांगितले की, पर्यटक आणि गाईडमध्ये पैशांवरून मारामारी झाली. यामुळे चिडलेल्या अब्दुल सौदागर याने आईला बोलावले, तो काही बाऊन्सर व इतरांसह घटनास्थळी आला आणि त्यांनी दोन तरुणांवर हल्ला केला, असे गावकऱ्यांनी सांगितले.

कळंगुट पोलिसांनी अब्दुल सौदागर (19) यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आशिष पालकर आणि शितिश केरकर यांना अटक केली असून, साईश पालकर अद्याप फरार आहे. आशिष आणि शितिश यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कळंगुट पीआय लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विराज नाईक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

Saint Francis Xavier School: संत फ्रान्सिस झेवियर विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस, धबधब्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका

Goa Live News Today: तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रासह गोव्यातही अग्निवर भरतीची रॅली

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC and One Nation One Election : UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

SCROLL FOR NEXT