चोरी पडली महागात; युक्रेनच्या युद्धभूमीवरून चोरलेल्या रॉकेटचा स्फोट

Explosion of Stolen Rocket in Russia : युक्रेनमधील युद्धभूमीवरून शस्त्रे काढून सीमेवर आणल्यानंतर रशियामध्ये कारचा स्फोट झाला आहे.
Explosion of Stolen Rocket in Russia
Explosion of Stolen Rocket in RussiaTwitter@UAWeapons
Published on
Updated on

Explosion of Stolen Rocket in Russia : मागील अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अशांतता मजली आहे. आता याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. युक्रेनमधील युद्धभूमीवरून शस्त्रे काढून सीमेवर आणल्यानंतर रशियामध्ये कारचा स्फोट झाला.

कारचा स्फोट झालेली ही छायाचित्रे सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. चोरी करून विकण्याच्या उद्देशाने एकाने हे कृत्य केल्यामुळे सर्वत्र याप्रकरणाची खिल्ली उडवली जात आहे. (Explosion of Stolen Rocket in Russia)

Explosion of Stolen Rocket in Russia
LICच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच; गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोपासून अवघ्या 10 मैल ईशान्येला असलेल्या मितीश्ची (Mytishchi) शहरात ही घटना घडली आहे.

माहितीनुसार,हाताने पकडलेल्या अँटी-टँक ग्रेनेड लाँचरचा स्फोट झाला असून यामध्ये दोन लोक जखमी झाले. हा स्फोट दारुगोळ्याच्या वापरामुळे झाला असून गाडीच्या डिकीमध्ये लष्कराच्या हँडग्रेनेड लाँचरसारख्या वस्तूही सापडल्या आहेत.

दरम्यान या स्फोटातील दोघा जखमी व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्या अंगावर माइनच्या स्फोटमुळे जखमा झाल्याचे आढळून आले. शिवाय जिथे कार पार्क होती तिथल्या परिसरातील लोकांना त्यांच्या घरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

जखमींपैकी एकजण 52 वर्षीय सेवानिवृत्त मेजर व्हिक्टर कोवटीकोव्ह आहे. कोवटीकोव्हने सैन्याने संरक्षित केलेल्या प्रदेशातून ग्रेनेड घेतले होते आणि ते विकण्याच्या उद्देशाने ते रशियाला परत आणले होते. त्याचा मित्र निकोले पोडोब्राझनी (वय 38) हा देखील या स्फोटात जखमी झाला असून आता त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

युक्रेनमधील तज्ञांनी या शस्त्राची ओळख स्वीडिश पॅन्सरस्कोट 86 (AT-4) (Swedish Pansarskott 86 (AT-4)) म्हणून केली.

युक्रेन शस्त्रास्त्र ट्रॅकर खात्याने ट्विटरवर आज या घटनेबद्दल पोस्ट केले आणि लिहिले: 'युद्धभूमीवरून वस्तू घेणे मूर्खपणाचे का आहे: आज, स्वीडिश पॅन्सरस्कोट 86 (AT-4) लाँचरचा स्फोट एका व्यक्तीच्या कारच्या ट्रंकमध्ये झाला. युक्रेनच्या रणांगणातून घेतले होते- कदाचित स्मृतीचिन्ह म्हणून किंवा विक्रीसाठी.’

दरम्यान, सोशल मिडियावर या प्रकरणची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com