Calangute Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Calangute Gram Sabha: 'आम्हाला गावात शाश्वत विकास हवा', ODP ला उच्च न्यायालयात आव्हान

कळंगुट ग्रामसभेत स्थानिक आक्रमक

दैनिक गोमन्तक

Calangute Gram Sabha: कळंगुट येथील ग्रामस्थांनी रविवारी विशेष ग्रामसभेत कळंगुटच्या बाह्यरेखा विकास आराखड्याला (ओडीपी) उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थानिकांनी याबाबत तीव्र विरोध दर्शवला असून गावासाठी हा आराखडा विनाशकारी ठरेल असे मत व्यक्त केले. सध्याचा ओडीपी कळंगुटमधील अनियोजित आणि आडकाठीचा विकास करू पाहत आहे.

आम्हाला गावात शाश्वत विकास हवा आहे आणि म्हणून हा ओडीपी आम्हाला मान्य नाही, असे ठाम बोल नागरिकांनी व्यक्त केले.

गावकऱ्यांना पाणी, वीज आणि योग्य रस्ते या मुलभूत गरजा पुरवण्यात सरकार अपयशी ठरले आहे, मात्र या ढिसाळ विकासातून मोठे प्रकल्प ते गावात आणू पाहात असल्याचा आरोप सरकारवर केला.

कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले की, इतरांकडे बोटे दाखवण्यात अर्थ नाही. आपण कळंगुटचे जे काही शिल्लक आहे ते वाचवू. ओडीपीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय ग्रामसभेने एकमताने घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

Ponda By Election: रितेश, भाटीकर की आणखी कोण? फोंडा पोटनिवडणूक ठरणार विधानसभेची प्रिलीम

अग्रलेख: सरकारला दात आणि नखे असलेला 'लोकायुक्तरूपी वाघ' तरी कसा परवडला असता?

Chimbel: 'तोयार तलाव' नष्ट करणार का? चिंबल युनिटी मॉलविरुद्ध वाल्मिकी नाईकांचा एल्गार; प्रकल्प अन्यत्र हलवण्याचा दिला सल्ला

Bandora: ..झळाळती कोटी ज्योती या!बांदोड्यात गरजू कुटुंबाचे घर उजळले; सोलर पॅनलचा केला वापर

SCROLL FOR NEXT