Calangute Crime Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: सिकेरीतील छाप्यात 8 लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त; ओडिशाच्या युवकाला अटक

कळंगुट पोलिसांची कारवाई

Akshay Nirmale

Calangute Police: गोव्याच्या बार्देश तालुक्यातील सिकेरी येथे शुक्रवारी कळंगुट पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 8 लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यात दीपक रावत (वय 35 वर्षे) या ओडिशाच्या तरूणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना एक जण ग्राहकांसाठी अमली पदार्थ घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. सिकेरी येथील वडाच्या झाडाजवळ संशयित थांबला होता. यावेळी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकत त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 8 किलो हिरवट रंगाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तो गांजा असल्याचा संशय आहे. त्याची सध्याच्या बाजाराभावानुसार किंमत 8 लाख रूपये असल्याचे सांगितले जात आहे.

दीपक रावत याच्यावर NDPS कायदा 1985 नुसार अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.

पोलिस उपनिरीक्षक परेश सिनारी, हेड कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर, पोलिस कॉन्स्टेबल अमीर गरड, गणपत तिलोजी, आकाश नाईक यांचा समावेश असलेल्या पोलिस पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन, पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: सभापती म्हणून डॉ. गणेश गावकर यांचे पहिले अधिवेशन

Ponda By Election: रितेश, भाटीकर की आणखी कोण? फोंडा पोटनिवडणूक ठरणार विधानसभेची प्रिलीम

अग्रलेख: सरकारला दात आणि नखे असलेला 'लोकायुक्तरूपी वाघ' तरी कसा परवडला असता?

Chimbel: 'तोयार तलाव' नष्ट करणार का? चिंबल युनिटी मॉलविरुद्ध वाल्मिकी नाईकांचा एल्गार; प्रकल्प अन्यत्र हलवण्याचा दिला सल्ला

Bandora: ..झळाळती कोटी ज्योती या!बांदोड्यात गरजू कुटुंबाचे घर उजळले; सोलर पॅनलचा केला वापर

SCROLL FOR NEXT