Calangute Police Drive  Dainik Gomantak
गोवा

Calangute: कळंगुट पोलिसांची कडक कारवाई! 24 जणांवर गुन्हा दाखल; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दलाल, भिकाऱ्यांवर नजर

Police action Calangute: पर्यटकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कळंगुट पोलिसांनी अवैध पद्धतीने कार्यरत दलाल किंवा किनाऱ्यांवर गोंधळ घालून इतरांना त्रास देणाऱ्यांवर ही कारवाई यापुढे सुरुच राहील असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Sameer Panditrao

Calangute police action against beach troublemakers

म्हापसा: समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य करीत, त्यांना नाहक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर दलालांचे शुक्लकाष्ठ संपलेले नाही. याच पार्श्वभूमीवर, शनिवारी कळंगुट पोलिसांनी किनाऱ्यांवर फिरणाऱ्या २४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. यामध्ये पाच दलाल तसेच सार्वजनिकस्थळी त्रास निर्माण करणारे अकरा जण तर आठ भिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

यातील पहिल्या उल्लंघनकर्त्यांना पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला तर दुसऱ्यांदा गुन्हा करणार्‍यांकडून तब्बल ५० हजार रुपयांचा दंड आकारला आहे. राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कळंगुट पोलिसांनी अवैध पद्धतीने कार्यरत दलाल किंवा किनाऱ्यांवर गोंधळ घालून इतरांना त्रास देणाऱ्यांवर ही कारवाई यापुढे सुरुच राहील असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कळंगुट किनाऱ्यावर दिवसेंदिवस दलालांच्या संख्या वाढत असून, पर्यटकांना हेरुन हे अनधिकृत दलाल लोकांची फसवणूक अन् लुबाडणूक करीत असल्याचे समोर आले आहे. सर्वच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gandhi Jayanti: एका दिवसाची गांधी जयंती अन् 364 दिवस अंधार; झाडू हातात घेण्यापेक्षा गांधीविचार जगण्याची गरज

Colvale Jail Threat: कैद्याकडून व्हिडिओ कॉलवर सुरा दाखवून धमकी? कोलवाळ कारागृहात खळबळ; हाय-सिक्युरिटी ब्लॉकची झडती

Shukra Gochar 2026: शरद पौर्णिमेचा चमत्कार! धनदाता शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, 5 राशींचे पालटणार नशीब; होणार पैशांचा वर्षाव

Teachers Digital Toolkit: गोव्यात शिक्षकांना मिळणार डिजिटल टूलकिट; 5,100 टॅब्लेटसाठी 'इन्फोटेक'कडून निविदा

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

SCROLL FOR NEXT