
Calnagute Beach Shack Owners Apology
कळंगुट: आमचा शॅक व्यवसाय हा केवळ पर्यटकांवरच अवलंबून असून पर्यटक मग तो देशी असो अथवा विदेशी यापुढे आमच्यासाठी देवासमान असेल. आमच्याकडून त्यांना कुठल्याही प्रकारची हानी अथवा नुकसान होईल असे कृत्य आपण अथवा आमच्या कर्मचाऱ्यांकडून होणार नाही या गोष्टीची ग्वाही देतो. तसेच मागच्या दिवसांत झालेल्या चुकांबद्दल जाहीर माफी मागतो, असे अखिल गोवा शॅक ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव जॉन लोबो यांनी सांगितले.
मायकल लोबो यांच्या कळंगुट येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जॉन लोबो बोलत होते. यावेळी आमदार लोबो तसेच कळंगुट, कांदोळी तसेच बागा परिसरातील शॅक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किनारी भागात खुलेआम फिरून पर्यटकांना सतावणाऱ्या भिकारी, विक्रेते तसेच टाऊट्स-दलाल यांच्यावर स्थानिक पोलिस काणाडोळा करत असल्याचा आरोप आमदार लोबो यांनी यावेळी केला. याबाबतीत आपण लवकरच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.
किनारी भागात कार्यरत असलेल्या शॅक व्यवसायिकांना यापुढे नवी नियमावली लागू करण्यात आलेली असून प्रत्येक शॅकवर स्थानिक पोलिसांचा क्रमांक ठळकपणे झळकावण्यात येईल. त्यामुळे एखाद्या वाईट प्रसंगी शॅक मालक अथवा (गिऱ्हाईक) पर्यटक आपल्या सुरक्षेसाठी तत्काळ स्थानिक पोलिसांनी संपर्क साधू शकेल. जेणेकरून मरहाणीसारख्या प्रकारांना आळा बसेल.
मायकल लोबो, कळंगुटचे आमदार तथा हॉटेल व्यावसायिक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.