Calangute Crime Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: आधी चोरले मोबाईल फोन; नंतर त्याच फोनमधील अनोळखी महिलांना कॉल करून द्यायचा त्रास...

कळंगुटमध्ये परप्रांतीय चोरट्याला अटक; तीन लाखांचे मोबाईल फोन जप्त

Akshay Nirmale

Calangute Crime: कळंगुटमध्ये एका परप्रांतीय मोबाईल चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरलेल्या फोनमधील महिलांचे नंबर शोधून तो त्या महिलांना फोन करून त्रास देत असल्याचे समोर आले आहे. खुद्द या चोरट्याने पोलिसांकडे याची कबुली दिली आहे.

याबाबत विप्लव गौतम देडाम (रा. नागपूर, महाराष्ट्र) यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यांचा मोबाईल चोरीला गेला होता. पोलिसांनी त्यांच्या सिम कार्डचा माग काढल्यानंतर त्यांचा फोननंबर सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून माग काढत पोलिसांनी चोरट्यास अटक केली.

सचिनकुमार (वय 19) असे या चोरट्याचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील गाझीपूरच्या देहवान येथील आहे. सध्या तो बार्देश तालुक्यातील बागा-कळंगुट येथे वास्तव्यास होता.

केवळ फोनची चोरी करून सचिनकुमार गप्प बसला नव्हता. या चोरीच्या फोनमधून त्याने महिलांचे फोन मिळवले होते. त्या महिलांना फोन करून तो त्रास देत होता. अनेक महिलांशी बोलायचा त्याने प्रयत्न केला. अनेक महिलांना त्याच्या अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

सचिनकुमार याला ताब्यात घेऊन कळंगुट पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने इतरही चोऱ्यांबाबत कबुली दिली. कळंगुट बीच परिसरातून त्याने अनेक मोबाईल फोन्स चोरले होते. एकूण १२ मोबाईल फोन त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. या सर्व मोबाईल फोन्सची एकूण किंमत सुमारे तीन लाख रूपये होते.

कळंगुट पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण मांद्रेकर, विद्यानंद आमोणकर, पोलिस कॉन्स्टेबल विजय नाईक, आमीर गरड, गणपत तिलोजी, प्रवीण चोडणकर, भगवान पायलेकर यांचा या पथकात समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT