Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: ग्राहकाला गांजा पुरवण्यासाठी आलेल्याच्या आवळल्या मुसक्या! कळंगुट पोलिसांची कारवाई

संशयित इब्राहिम पस्तुनी (45, रामनगर-पर्वरी) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी सिकेरी-कांदोळी भागात मध्यरात्री छापा टाकण्यात आला. यावेळी ग्राहकाला गांजा पुरवण्यासाठी आलेल्या संशयित इब्राहिम पस्तुनी (45, रामनगर-पर्वरी) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. राज्यभरात अमलीपदार्थ विरोधी प्रकारांबाबत पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कांदोळी भागात अमली पदार्थ ग्राहकाला देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. याप्रकरणी सापळा रचत पोलिसांनी इब्राहिमला अटक केली आहे. संशयिताकडून 92 हजार रुपयांचा 920 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

सध्या संशयित इब्राहिम पस्तुनीची पोलीस कोठडीत रवानगी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

पुढील तपास कळंगुट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक परेश नाईक, यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

50 वर्षीय आरोपीचा 'मानसिक' बनाव फसला! POCSO न्यायालयाने जामीन फेटाळला; 'IPHB'ची कागदपत्रंही निरुपयोगी

Brahmin History: अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति। ब्राह्मणी उपासना आणि सभ्यता

Goa Live News: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट' शॅकला भीषण आग

Theatre Tradition Goa: समृद्ध परंपरा लाभूनही, गोमंतकीय रंगभूमीला वर्तमानकाळात अनेक आव्हानांना सामोरे का जावे लागत आहे?

Goa Culture: गोव्यातील मूर्ती अर्पण करण्याची दुर्मिळ परंपरा आणि कृषी संस्कृतीचे महत्व; निसर्ग संस्कृतीतील टेराकोटा

SCROLL FOR NEXT