Goa Drug Case
Goa Drug Case  Dainik Gomantak
गोवा

Nigerian Youth Drug Case: कळंगुट पोलिसांनी केली कारवाई

दैनिक गोमन्तक

कळंगुट: कळंगुट पोलिसांनी मंगळवारी पहाटे केलेल्या कारवाईत लकी एकोमोये (40) या नाजरेरीयन तरुणाला अमली पदार्थांच्या देवाणघेवाणीवरून ताब्यात घेतले आहे. यावेळी संशयिताकडील 1 लाख 40 हजारांचा एमडीएमए हा मादक पदार्थ पोलिसांनी जप्त केला. (Calangute Police arrested a Nigerian youth in a drug case )

संशयित एकोमोये सध्या कळंगुट पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तप्रसाद नाईक करत आहेत.

दरम्यान, पावसाळा कमी झाल्याची चिन्हे दिसताच अमली पदार्थ व्यवहाराशी संबंधित नायजेरियन टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या मार्गावर असल्याने कळंगुट पोलिसांनी याबाबतीत कंबर कसल्याची माहिती स्थानिक पोलिस सूत्रांनी दिली. यापूर्वीही नायजेरियनांना अमली पदार्थ प्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

नायजेरियन तरुण आणि अमली पदार्थ

गेल्या काही वर्षात गोवा राज्यात नायजेरियन अनेक तरुणांवर अमली पदार्थ तस्करी प्रकरणातून कारवाई झाली आहे. मात्र राज्यात या माध्यमातून होत असलेला अमली पदार्थाचा पुरवठा अथवा तस्करी काही केल्याने संपूर्णपणे थांबण्यास तयार नाही. नायजेरियन तरुणांकडे अमली पदार्थ सापडले कि, गोवा पोलीस अथवा संबधीत विभाग यावर कारवाई करतात.

हा प्रश्न कारवाई पुरता मर्यादीत नाही. गेल्या काही वर्षात कारवाईचा मागोवा घेतल्यास वाचकाच्या लक्षात येईल कि, कारवाई होते, ती एका ठराविक मर्यादेपर्यंत यानंतर या प्रश्नावर व्यापकरित्या पाहिले जात नसल्याने अंतर्गत पुन्हा अमली पदार्थ पुरवठा आणि तस्करी सुरुच असते. त्यामूळे या प्रश्नावर प्रत्येक कारवाईनंतर फक्त चर्चा होणार आहे का ? कि काही ठोस पावले उचलली जाणार आहेत. याचं उत्तर ही आता गोवेकरांना मिळत नाहीये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

Kala Academy Viral Video: मंत्र्यांसारखे कला अकादमीचे लाईट्स रंग बदलतात; राजदीपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT