सांगेत 71 शासकीय मालमत्ता हडप

अवैधपणे विक्रीप्रकरणी एसआयटीकडे गुन्हा नोंद
Government Property in Sanguem
Government Property in SanguemDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : सांगे येथील अधिसूचित केलेल्या सरकारी जमिनीतील ७१ मालमत्ता हडपप्रकरणी विशेष तपास पथकाने गुन्ह्याची नोंद केली. या मालमत्तेचे अवैधपणे भूखंड करून त्याची परस्पर विक्री केल्याचे आढळून आले आहे. प्रकरणात गुंतलेल्यांची माहिती जमा करून लवकरच त्यांचीही चौकशी होणार आहे. सांगे मामलेदारांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

एसआयटी प्रमुख निधीन वाल्सन यांनी सांगितले की, या तक्रारीची प्राथमिक चौकशी करून महसूल खात्याकडून मिळवलेल्या अहवालानुसार ही मालमत्ता विकण्यात आली आहे. पोर्तुगीज काळातील सोसिएदाद पेट्रोटिका बेल्डोस दास नोव्हास कॉन्कीस्टास ही मालमत्ता सरकारच्या ताब्यात असताना बनवाट दस्तावेजाद्वारे ती विकण्यात आली आहे. या जमिनीची विक्री २०१३ पासून होत आली आहे.

राज्यात बेकायदेशीररित्या जमीन हडप केलेल्या प्रकरणांंची चौकशी करण्यास स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने 7 तक्रारींमध्ये गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील इतर पोलिस स्थानकात नोंद असलेल्या जमीन हडप प्रकरणाचे 28 गुन्हे एसआयटीकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या 35 गुन्हे नोंद आहेत. जमीन हडपप्रकरणी संघटित गुन्ह्यांवर अधिक भर देण्यात येत आहे. एसआयटीकडे दिडशेहून अधिक जमीन हडप संबंधित प्रकरणे आली आहेत. आतापर्यंत एका महिलेसह 9 जणांना अटक झाली आहे व त्यापैकी 8 जण सशर्त जामिनावर आहेत. 2 सरकारी कर्मचाऱ्यांना अटक व सुटका झाली आहे. जसजशी या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून येईल त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असे वाल्सन म्हणाले.

Government Property in Sanguem
Smriti Irani : 'सिली सोल्स'वर जाहीर चर्चा करा!

या जमीन हडप प्रकरणी संशयितांच्या टोळ्या गेल्या काही वर्षापासून राज्यात वावरत असून जे गोमंतकिय गोव्याबाहेर आहेत व ज्यांची मालमत्ता पडीक आहे त्या संशयितांनी लक्ष्य केल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्या जमिनी गोव्यात आहेत व वास्तव्यास परदेशात आहेत त्यांनी गोव्यातील आपल्या मालमत्तेची भू नोंदणी कार्यालयात जाऊन त्याची माहिती घ्यावी. त्यांच्या या जमिनीवर इतर कोणाची नावे नोंद असल्यास त्याची तक्रार दाखल करावी असे आवाहन अधीक्षक वाल्सन यांनी केले.

जमीन हडप करण्याची सर्वाधिक प्रकरणे ही बार्देश तालुक्यात आहेत. एसआयटीकडे सुमारे 100 तक्रारी आहेत. त्यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक उत्तर गोव्यातील आहेत. आमदार जीत आरोलकर याच्याविरुद्ध आरटीआय कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांचीगी तक्रार दाखल आहे. त्याची पडताळणी करण्यात येत आहे. त्यात काही सापडल्यास गुन्हा नोंद केला जाईल असे अधीक्षक वाल्सन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com