Calangute Police Arrested Mobile Theft Dainik Gomantak
गोवा

Calangute Mobile Theft: पर्यटकांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

संशयितांकडून 6 मोबाईल फोन आणि 1 लॅपटॉप जप्त

Rajat Sawant

Calangute Mobile Theft: पर्यटकांचे मोबाईल व लॅपटॉप चोरी करणार्‍या 3 संशयितांना अटक करण्यात कळंगुट पोलिसांना यश आले आहे. संशयितांकडून 6 मोबाईल फोन आणि 1 लॅपटॉप असा एकूण 1.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंगुटला भेट देणार्‍या पर्यटकांचे मोबाईल चोरणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कळंगुट परिसरात पाळत ठेवली.

यावेळी पोलिसांनी तीघांना संशयितावरुन ताब्यात घेतले. संशयितांची चौकशी केली असता कळंगुट येथे येणाऱ्या पर्यटकांचे मोबाईल लंपास केल्याचे कबूल केले. संशयितांकडून 6 मोबाईल फोन आणि 1 लॅपटॉप असा एकूण 1.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

माजिदोर मोल्ला (35, रा. जुने गोवे, मूळ पश्चिम बंगाल), जोहरुल आलम मुल्ला (27, रा. कळंगुट मूळ पश्चिम बंगाल) व सैफुल आलम (22, रा. बागा, मूळ पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

हेड कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर, कॉन्स्टेबल भगवान पालयेकर, गणपत तिळोजी, अमिर गरड व आकाश नाईक या कळंगुट पोलिसांच्या विशेष पथकाने चोरीचा माल हस्तगत केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

SCROLL FOR NEXT