Calangute Crime News: गोव्यातील भाड्याची वाहने कोल्हापूरात विक्री करणाऱ्या दोघांना अटक

कळंगुट पोलिसांची कारवाई
Calangute Crime News
Calangute Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Crime News : गोव्यातून भाड्याने कार/बाईक घेऊन त्याचा रंग व नोंदणी क्रमांक कोल्हापुरात बदलणाऱ्या दोघा संशयितांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 दुचाकी व 1 चारचाकी अशी एकूण 6 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, ब्लू कलरची होंडा अ‍ॅक्टिव्हा 6G स्कूटर आणि कार संशयितांनी बागा, कळंगुटमधून भाड्याने घेतली व दिलेल्या तारखेत वाहने परत न केल्याची तक्रार पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. वाहने भाड्याने घेताना संशयितांनी खोटे ओळखपत्र सादर केल्याचे आढळून आले.

Calangute Crime News
Mahadayi Water Dispute : कोणत्याही परिस्थितीत म्हादई वळवली जाणार नाही : मुख्‍यमंत्री डॉ. सावंत

त्यानुसार, पोलिसांनी या उपलब्ध मोबाईल क्रमांक व वारंवार तांत्रिक पाळत ठेवत संशयितांचा माग काढला. संशयित वारंवार आपली ठिकाणे बदल होते.

सततच्या प्रयत्नांमुळे पीआय कळंगुट यांच्या देखरेखीखाली हेडकॉन्स्टेबल सतीश सावंत, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चारी आणि गौरव चोडणकर यांच्या पथकाने या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन संशयितांचा उचगाव, कोल्हापूर येथे शोध घेतला

पोलिसांनी संशयिताची चौकशी केली असता त्यांनी गोव्यातून 4 वाहने अशाच पद्धतीने चोरुन आणली असल्याची कबूली दिली. संजय कलके (करवीर, कोल्हापूर) व सद्दाम जमादार (उचगाव, कोल्हापूर) या महाराष्ट्रातील संशयितांना अटक केली.

संशयित गोव्यातील रेंटवरील कार किंवा दुचाकी कोल्हापूरमध्ये आणायचे. तिथे ते वाहनांचा रंग व नोंदणी क्रमांक बदलून वाहनांची विक्री करत असत.

कळंगुट पोलिसांनी या टोळीचा पदार्फाश केला असून, याप्रकरणी आणखी दुचाकी जप्त होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत हे करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com