Planet Shack Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: कळंगुटमध्ये शॅकवाल्यांची दादागिरी! मुंबईच्या पर्यटकांना मारहाण; स्थानिक पंच सदस्यासह 5 जणांना अटक

Mumbai Tourist Assault In Calangute: कळंगुट येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पुन्हा एकदा पर्यटकांना निशाणा बनवण्यात आले.

Manish Jadhav

कळंगुट येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पुन्हा एकदा पर्यटकांना निशाणा बनवण्यात आले. येथील प्लॅनेट गोवा शॅकवर मुंबईहून आलेल्या पर्यटक आणि शॅक कामगार यांच्यात शुक्रवारी (3 जानेवारी) पहाटे 3 वाजता झालेल्या वादावादीत एक पर्यटक गंभीर जखमी झाला.

या प्रकरणात स्थानिक पंच सदस्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या सप्टेंबरमध्ये याच शॅकमध्ये गुजरातच्या पोलिसाला मारहाण झाली होती. नौफाल पी. टी. (28 केरळ), रोहित कुमार (27), अभिषेक कुमार (24), विनोद कुमार (31), सुरिंदर कुमार (28) (चौघेही हिमाल प्रदेशचे) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

मारहाणीचे प्रकार

दरम्यान, कळंगुटमध्ये (Calangute) गेल्या काही दिवसांत मारहाणीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी, येथेच किनाऱ्यावरील 'मरीना बीच' शॅकमध्ये जेवणाच्या ऑर्डवरुन आठ जणांचा पर्यटकांचा गट आणि शॅक मालक यांच्यात झालेल्या वादातून एका पर्यटकाचा खून झाला होता. बोल्लारवि तेजा असे पीडित पर्यटकाचे नाव होते.

केरळच्या पर्यटकांना निशणा बनवले

तर दुसरीकडे, कळंगुटमधील एका हॉटेलमध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोर पर्यटकांचे मोबाईल फोन हिसकावून पसार झाले होते. मात्र कळंगुट पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

केरळ येथील पर्यटक (Tourists) पर्यटनासाठी गोव्यात आले होते. ते हॉटेलमधील त्यांच्या खोलीकडे जात असताना ओशॅनिक शॅक बार्देश येथे जवळ पोहोचले असता चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या तिघा संशयितांनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले. संशयितांनी फिर्यादी आणि त्याच्या 3 मित्रांचे अंदाजे 1 लाख 80 हजार रुपयांचे मोबाईल फोन हिसकावून नेले होते. याबाबतची तक्रार पर्यटकाने कळंगुट पोलिसांत दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

SCROLL FOR NEXT