Calangute Panchayat
Calangute Panchayat 
गोवा

Calangute Panchayat: कळंगुटमध्ये प्रवेशासाठी आता द्यावा लागणार 'टॅक्स'? साताऱ्यातील महाबळेश्वरच्या धर्तीवर अवलंब

Pramod Yadav

Calangute Panchayat

कळंगुटमध्ये प्रवेश करणाऱ्या पर्यटकांकडे वैध हॉटेल बुकिंग आहे का नाही? याची चौकशी करुनच त्यांना हद्दीत प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा केल्यानंतर आता पंचायतीने कळंगुटमध्ये होणारा कचरा, प्रदुषण आणि हुल्लडबाजीविरोधात मोठे पाऊल उचलले आहे.

लवकरच कळंगुटमध्ये प्रवेशासाठी पर्यटकांना 'टॅक्स' द्यावा लागू शकतो. पंचायतीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे.

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या धर्तीवर ही कर पद्धत लागू केली जाणार असल्याचे माहिती समोर आली आहे. कळंगुट पंचायतीचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, जगप्रसिद्ध कळंगुट समुद्रकिनारा आणि पंचायत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ही कर आकारणी केली जाणार आहे.

पर्यटक जीपमधून येतात दारू पितात आणि नंतर कचरा पसरवतात. हा कचरा गोळा करण्याची जबाबदारी पंचायतीवर येते त्यामुळे कर आकारणीचा निर्णय घेतल्याचे सिक्वेरा सांगतात. महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये अशा प्रकारची कर आकारणी केली जाऊ शकते तर येथे का नाही, असेही स्पष्टीकरण सिक्वेरा यांनी दिले आहे.

पर्यटकांकडून होणारा कचरा याबाबत बऱ्याच तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सिक्वेरा म्हणाले. पंचायतीची याबाबत सात जून रोजी बैठक घेण्यात आली होती.

कर आकारणीचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर त्याची कशी अंमलबाजणी करायाची याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सिक्वेरांनी एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

पर्यटनासाठी आलेले पर्यटक मद्य घेतल्यानंतर रिकाम्या बाटल्या, खाऊचे पॅकेट्स तसेच किनाऱ्यालगत अथवा मोकळ्या जागेत सोडून देतात. हा कचरा पंचायतीला उचलावा लागतो.

कर आकारणीसाठी पंचायतीने पाच एन्ट्री पाईंट निश्चित केले आहेत. याठिकाणी पोलिस आणि पंचायत एकत्र पद्धतीने तपासणी करुन पर्यटकांना प्रवेश देईल.

कळंगुट - साळगाव हद्द, कळंगुट- हडफडे हद्द, फॅट फिश रेस्टॉरंट अगरवाडो, बागा बीच जवळ आणि कळंगुट कांदोळी पंचायतीची हद्द असे पाच पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Goverment: ‘गुरुदक्षिणा’ घेण्यासाठी ‘ॲक्सिस’मध्ये खाते उघडा!

Goa Pilgao Farmers: प्रसंगी मुलांबाळांसह जीवन संपवू; पिळगावमधील शेतकरी आक्रमक

Canacona News: गालजीबाग येथील पर्यावरणास घातक प्रकल्प रोखा! स्थानिक आक्रमक

Goa Asgaon: आसगावात भूमाफियांविरोधात ग्रामस्थ आक्रमक; नाईट क्लबवर हल्लाबोल

घोडगावयलो

SCROLL FOR NEXT