chhatrapati shivaji maharaj Statue At Calangute Dainik Gomantak
गोवा

Chatrapati Shivaji Maharaj : कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 10 दिवसांत हटवा - कळंगुट पंचायत

यासंबंधी कळंगुट पंचायतीने संबंधित शिवस्वराज्य-कळंगुट संस्थेला आदेश दिले

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute News : कळंगुट येथील पोलिस स्थानकाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा 10 दिवसांत हटविण्यासंदर्भात आदेश कळंगुट पंचायतीने संबंधित शिवस्वराज्य-कळंगुट संस्थेला दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंगुट-साळगाव या मार्गावरील कळंगुट पोलिस स्थानकाजवळ स्थानकाच्या जंक्शनवर शिवस्वराज्य कळंगुट या संस्थेकडून शिवरायांचा हा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आलेला.

दरम्यान सदर पुतळा 10 दिवसांत हटविण्यासंदर्भात आदेश कळंगुट पंचायतीने संबंधित शिवस्वराज्य-कळंगुट संस्थेला दिले आहेत. पुतळा उभारण्यासाठी कुठलीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. सदर पुतळा हा बेकायदेशीर असल्याचे कळंगुट पंचायतीने जारी केले आदेशात म्हटले आहे.

सदर पुतळा दहा दिवसांत न हटविल्यास पंचायतीकडून आवश्यक कारवाई करुन तो हटविला जाईल आणि पोलिसांसमोर तक्रार दाखल केली जाणार असेही पंचायतीने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SCROLL FOR NEXT